जनतेच्या आयुष्याशी खेळणारा राष्ट्रवादी काॅग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सतिष शिंदेवर गुन्हा दाखल
दुध भेसळ प्रकरणाचा पर्दाफाश
आष्टी-आपल्या दूधाचा धंद्यात तेजी यावी म्हणून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खेळत पंढ-या दुधावरचे काळे बोके शेफारले आहेत.असाच पांढ-या दुधाचा काळा धंदा करणा-या आष्टी जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सतिष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून,एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आष्टी शहरातील बनावट दुध तयार करण्याची माहिती दि.15/03/2023 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली असता आष्टी हददीतील संभाजी नगर येथील पिठाची गिरणीच्या बाजुला एका खोली मध्ये बनावट दुध तयार करण्यासाठी लागणारे पावडर, रसायण हे साहित्य खाली करीत आहेत.अशी खात्रीशिर माहीती मिळताच आष्टी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग बीड यांना संपर्क करुन बोलावुन घेतले.यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीडचेसय्यद इम्रान हाश्मी,नमुना सहाय्यक मुक्तार सय्यद हे आले सदर ठिकाणी मिळुन आलेल्या पावडरच्या 132 पांढऱ्या व खाकी रंगाच्या गोण्या व पत्राचे 220 डब्बे पैकी अन्न व औषध प्रशासन विभागचे अधीकारी यांनी आवश्यक नमुने विश्लेषन तपासणी करीता राखुन ठेवले. याप्रकरणी सय्यद इम्रान हाश्मी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कारवाई मध्ये बनावट दुध तयार करण्याचे साहित्य व त्यासाठी वापरत असलेले पिकअप व इंडीका असा एकुण 89 लाख 1 हजार 375/- रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन सदर ठिकाणी मिळुन आलेला इसम नामे नंदु भागवत मेमाणे व ज्या ठिकाणी बनावट दुध तयार केले जाते.त्या जगदंबा मिल्क ऍ़ण्ड मिल्क प्रॉडकटसचे मालक सतीश नागनाथ शिंदे यांचे विरोधात गुन्हा दाखल असुन इसम नामे नंदु मेमाणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,उपविभागीय पोलीस अधीकारी अभिजीत धाराशिवकर यांचे मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक हेमंत कदम,सपोनि विजय देशमुख,पोउपनि प्रमोद काळे,पोउपनि नामदेव धनवडे,पोह दत्तात्रय टकले,महीला पोलीस हवालदार स्वाती मुंडे,पोलीस अंमलदार प्रविण क्षीरसागर,अमोल ढवळे,बब्रुवान वाणी,भरत गुजर,शिवप्रकाश तवले,आकाश आडागळे,सचिन पवळ,रियाज पठाण,सचिन कोळेकर,जिजा आरेकर,मर्जीना शेख व होमगार्ड पथकातील जवान व सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग बीड,नमुना सहाय्यक बीड यांनी केली.
छापा टाकला आता पण पुढे काय?
अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळ होत असल्याच्या संशयावरून एखाद्या दुकानावर,दुध संघावर छापा टाकतात.मात्र,एक छापा टाकला तरी त्याच्या तपासणीचे नमुने लवकर प्राप्त होत नाहीत,त्या कारवाईचे पुढे काय होते,हे नागरिकांना समजत नाही. मात्र,अशी कारवाई झाली की संबंधीत भेसळीवाले साहेबांचे हात ओले करतात,त्यानंतर कारवाईला विश्रांती मिळते,फार्स नको तर प्रत्यक्षात कठोर कारवाई करावी,अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.
दुधसंस्थाच नाही तर किराणा दुकानांवरही छापे मारा
आष्टी तालुक्यात काही छोट्या व्यापारी वर्गाबरोबर तेल आणि दूध विक्रीत काही बडे व्यापारी गुंतले आहेत.या साखळीत अगदी हुबेहूब दिसणारे तेल आणि दूध बनविण्यासाठी हानिकारक केमिकल्सचा वापर होत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे प्रामुख्याने तेल आणि दूधाचे तालुक्यातील विविध ठिकाणचे नमुने तपासण्याची गरज आहे.
नगर जिल्ह्याशी लागेबांधे
भेसळ दुध प्रकरणासाठी लागणारे साहित्य शेजारील नगर जिल्ह्यातून होत असून,तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुध भेसळ होत असून,अन्न भेसळ प्रशासनाने या प्रकरणी धडक मोहिम सुरू करण्याची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.