वकीलपत्र नाकारल्याच्या वावड्या उठवून बदनामीचे षडयंत्र-निता सतीश शिंदे
आष्टी-शहरातील संभाजीनगर परिसरातील बनावट दूध भेसळ प्रकरणात माझे नाव आले आहे.या प्रकरणात माझा कसलाही संबंध नसल्याचे या आगोदरही माझे पती सतिश शिंदे यांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणात काय सत्य काय? असत्य ते समोर येईलच,यात काही शंका नाही.परंतु आष्टी वकील संघाकडून त्यांचे वकीलपत्र नाकारल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या आहेत.अनेक वकिलांनी दैनिकाच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून आष्टी वकील संघाचा कसलाही असा ठराव झालेला नसून सतीश शिंदे यांचं वकीलपत्र नाकारण्याचा विषय येतच नाही असे देखील स्पष्ट केले आहे,असे सतीश शिंदे यांच्या पत्नी निता शिंदे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलतांना त्याम्हणाल्या सतीश शिंदे यांच्यावर झालेले आरोप खूप गंभीर असून ते योग्य आहेत की अयोग्य हे कालांतराने समोर येतील.परंतु तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे राजकीयदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करणे सुद्धा योग्य नाही.अशा देखील प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून येत आहेत.सतीश शिंदे यांच्यावर वाळू माफिया,उडीद घोटाळ्यात ही आरोपीचा संबंध तसेच दूध भेसळीत सुद्धा संबंध असल्याच्या बातम्या येत असून,जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.परंतु सत्य काय आहे हे समोर येईपर्यंत एखाद्या व्यक्तीला इतकं बदनाम करू नये की राजकीय दृष्ट्या,व्यावसायिक दृष्ट्या पूर्ण व्यक्ती संपून जाईल याचा सुद्धा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे.आशा भावनिक प्रतिक्रिया सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक सुज्ञान युवक व्यक्त करत आहेत.एखाद्याची बदनामी करताना कोणत्या थराला जावं हे सुद्धा लक्षात येत नाही.जेव्हा अटक केली जाते तेव्हाच आरोपपत्र दाखल केलं जात आणि तिथून पुढेच ठरवलं जातं की वकीलपत्र नाकारलं की स्वीकारलं.पण सतीश शिंदे यांच्या प्रकरणात अटक नसल्यामुळे आष्टीचा कसलाच संबंध नसताना वकिलांकडून वकीलपत्र नाकारल्याच्या बातम्या पेरल्या.परंतु त्यात कसलेही तथ्य नसल्याचं समोर आले आहे.अनेक वकिलांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की सतीश शिंदे यांचं वकीलपत्र नाकारण्याचा विषय येतच नाही.तसेच असा कुठलाही ठराव घेतलेला नाही.त्यामुळे या सर्व बातम्या खोट्या आहेत आशा प्रतिक्रिया बऱ्याच वकिलांकडून आल्या असल्याचेही शिंदे यांनी सांगीतले.