तीन लाख घेऊन तीन गाणे नाचती… तरी लोकांना ती पटती-ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर
आष्टी-महाराष्ट्र सध्या कुणाला डोक्यावर घेईन ते सांगता येत नाही.आता नविनच क्रेझ आली आहे.एका बायानं सा-या तरूणाईला यंड लावलं असून,तीन लाख घेऊन,तीनच गाणे नाचती अन् तरी लोकांना ती आवडती अन् यात पण तीनशे पोरांच्या चड्ड्या फाटतात अन् काय म्हणे हि महाराष्ट्राची संस्कृती असा टोला लावणी फेम गौतमी पाटील हिचं नाव घेता ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी लगावला आहे.
आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आज शनिवार दि.२५ रोजी दुपारी ५ वा.किर्तन सेवेत ते बोलत होते.पुढे बोलतांना ह.भ.प.इंदूरीकर म्हणाले,सध्याची तरूणाई ही मोबाईलमध्ये गुंतली असून,या मोबाईलने माणसात माणूस ठेवलं नाही.आता महाराष्ट्रात नविनच क्रेज आली ती लई अवघड आहे.ती म्हणजे तीन लाख घेती,तीन गाणे नाचती अन् तरीही ती लोकांना आवडती अन् काय म्हणे सबसे कातील आरे यामुळे महाराष्ट्राची संस्कृती कुठे नेऊन ठेवली आता तुम्हीच ठरवा असा टोला ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदूरीकर यांनी सबसे कातील गौतमी पाटील हिचे नाव न घेता लगावला आहे.