व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

श्रीराम..जय श्रीरामच्या जयघोषात आष्टी दणाणली

भगवंत भक्तांनाच मुक्ती देतो असे नाही तर वै-यालाही मुक्ती देतो-ह.भ.प.श्रीहरि पुरी महाराज

0

आष्टी-श्रीराम… जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण आष्टी शहर दणाणले असून,जयघोषात सांयकाळी ६ ते १० वाजेपर्यंत उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात श्रीराम जन्म साजरा झाला.या मिरवणूकीत आष्टी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने तरूण सहभागी झाले होते.तसेच रामजन्मानिमित्त शहरातील राम गल्लीतील राम मंदीरात ह.भ.प.श्रीहरी पुरी यांनी किर्तनसेवा देत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
आष्टी येथील श्रीराम मंदीरात रामजन्मोत्सवानिमित्त आयोजित सप्ताहातील काल्याचे कीर्तनप्रसंगी ह.भ.प. श्रीहरि महाराज पुरी बोलत होते.यावेळी ह.भ.प.पुरी महाराज यांनी धर्म रक्षावया अवतार घेशी,आपुल्या पाळीसी भक्तजना हा संत तुकाराम महाराज यांचा अभंग सोडविला.यावेळी आ.सुरेश धस,ट्रस्टचे पदसिध्द अध्यक्ष तहसिलदार विनोद गुड्डमवार,ह.भ.प.दिनकरराव तांदळे, अनंत हंबर्डे,सुखलाल मुथा,ह.भ.प.रामदास डोरले महाराज,बाबुराव अनारसे,भारत मुरकुटे,संग्राम गळगटे, श्रीकृष्ण देशपांडे,बलभीमराव सुंबरे,रघुनाथ आवारे,मंडळ अधिकारी शरद शिंदे,ह.भ.प.लालासाहेब राक्षे महाराज,प्रा.वसंतराव देशमुख,रघुनाथ शेळके,संपतराव धोंडे,मुकुंद बुरांडे,पत्रकार उत्तम बोडखे,गणेश दळवी,सचिन रानडे,प्रविण पोकळे,भाऊसाहेब कोकणे आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.सुरेश धस आणि
तहसिलदार विनोद गुड्डमवार यांनी मनोगत व्यक्त करीत रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थितांचे ह.भ.प.रामदास डोरले महाराज यांनी आभार मानले.यावेळी मारुती सानप रामाचा उत्कृष्ट पाळणा गायनाबद्दल तर राम लक्ष्मण सीतामातेचा उकृष्ट पोषाख बनविल्याबद्दल कु.अमृता अनंत जोशी यांचा मान्यवरांच्या सस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.