व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीतील दूध भेसळ प्रकरणी सतिष शिंदे यांचा बीड न्यायालयाकडून अटकपूर्व जामिन मंजूर

0

आष्टी-दुधात भेसळ करण्यासाठी आणलेल्या भेसळीच्या सहित्य पंधरा दिवसापूर्वी हाती लागले होते.या प्रकरणात जगदंबा मिल्क अॅण्ड मिल्क प्राॅड्क्सचे मालक तथा राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सतिष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता तर एका आरोपीला ताब्यात घेतले होते.या दूध भेसळ प्रकरणी आपला कसलाही संबंध नसून,आपल्या विरोधकाचे हे षढयंञ असल्याचे सांगत अटक पुर्व जामिनीसाठी बीड जिल्हा न्यायालयात अटक पुर्व जामिन अर्ज सतिष शिंदे यांनी दाखल केला होता.त्या अर्जावर आज बीड न्यायालयाने सुनावणी घेत सतिष शिंदे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की,आष्टी शहरातील बनावट दुध तयार करण्याची माहिती दि.15/03/2023 रोजी गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली असता आष्टी हददीतील संभाजी नगर येथील पिठाची गिरणीच्या बाजुला एका खोली मध्ये बनावट दुध तयार करण्यासाठी लागणारे पावडर,रसायन हे साहित्य खाली करीत आहेत.अशी खात्रीशिर माहीती मिळताच आष्टी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग बीड यांना संपर्क करुन बोलावुन घेतले.यावेळी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन बीडचेसय्यद इम्रान हाश्मी,नमुना सहाय्यक मुक्तार सय्यद हे आले सदर ठिकाणी मिळुन आलेल्या पावडरच्या 132 पांढऱ्या व खाकी रंगाच्या गोण्या व पत्राचे 220 डब्बे पैकी अन्न व औषध प्रशासन विभागचे अधीकारी यांनी आवश्यक नमुने विश्लेषन तपासणी करीता राखुन ठेवले होते.याप्रकरणी सय्यद इम्रान हाश्मी यांचे फिर्यादीवरुन आष्टी पोलिसात सतिष शिंदे व अजून एका वर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी नंदू नेमाणे याला पोलिसांनी अटक केली होती.तर दुसरा आरोपी सतिष शिंदे हे फरार होत त्यांनी अटकपूर्व जामिनसाठी बीड न्यायालयात अर्ज केला होता.त्यावर बीड जिल्हा न्यायालयाने आज दि.१ एप्रिल रोजी शिंदे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.