व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बोंबला…!आता हनुमानरायाच्या जन्माला…गौतमी धामणगावाला…

ग्रामदैवत हनुमान व पिर बाबाच्या याञेनिमित्त कार्यक्रम

0

आष्टी-अजन्म ब्रम्हचारी राहून भगवान श्रीरामाची अविरत सेवा करत ज्ञानाचा सागर म्हणून ओळखल्या जाणा-या हनुमानरायांच्या किर्तीचा डंका संपूर्ण जगात आहे.सकल हिंदूचे दैवत म्हणून पुजल्या जाणा-या हनुमान रायाच्या जन्मोत्सावाला चक्क धामणगावकरांनी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करून जणू काहि हनुमानाची किर्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून धामणगावकरांना माहिती होणार आहे की काय ? असा सवाल असा सर्वसामान्यांना पडला असून या कार्यक्रमाची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
आत्ता पर्यंत लेकराच्या,बायकोच्या वाढदिवसाला सबसे कातील गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होतांना आपण पाहिले पण आता चक्क हनुमान जन्मोत्सावा निमित्तच गौतमी पाटील हिचा कार्यक्रम ठेवल्याने एकच चर्चा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील धामणगांव या गावचे ग्रामदैवत हनुमान व पिरबाबा असून,यानिमित्त दि.८ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी चक्क गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्यामुळे हनुमानरायाच्या जन्माला…गौतमी पाटील धामणगांवाला अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.
आज पर्यंत एकही कार्यक्रम पूर्ण नाही
सबसे कातील गौतमी पाटील अशी ओळख असलेल्या गौतमी पाटील यांचे आष्टी तालुक्यात सात-आठ कार्यक्रम झाले पण आत्ता पर्यंत एकही कार्यक्रम पुर्ण झालेला नाही शिवाय गौतमी पाटील स्टेजवर येताच प्रेक्षकांचा धिंगाणाहोऊन कार्यक्रम आर्ध्यावर बंद करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे.त्यामुळे जिचे अर्धवट कार्यक्रम होतात तिच गौतमी का? अशी चर्चा नागरीकात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.