माणसाने जे आहे त्यात आनंद मानून जीवन जगले पाहिजे-प्रा.गणेश शिंदे
आष्टी-आनंद आणि सुख जर पैशाने विकत मिळत असत्या तर श्रीमंत माणूस कायम आनंदी आणि गरीब माणूस कायम दु;खात असते पण देवाने असं काहि केले नाही.त्यामुळे माणसाने आहे त्यात आनंद मानून आपले जीवन जगले पाहिजे तर आपले जीवन आनंदी होईल असे प्रतिपादन प्रा.गणेश शिंदे केले.
आष्टी येथे भगवान महावीर जयंतीनिमित्त आनंद ञृषीजी चौक,कापड बाजार येथे सकल जैन समाजाच्यावतीने रात्री ८ वा.वाजता प्रसिद्ध व्याख्याते प्रा.गणेश शिंदे यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर
बोलत होते.यावेळी व्यासपीठाव माजी आ.साहेबराव दरेकर,युवानेते अजय दादा धोंडे,युवानेते महेश भैय्या आजबे,सुखलाल मुथ्था यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.पुढे बोलतांना प्रा.गणेश शिंदे म्हणाले,आपण बोललो म्हणजे समाज बदलेल अशा काहि फंदात न पडता हे समाज प्रबोधन करून आपण जरी बदललो तरी लई झाले.ज्या दिवशी आपल्यातील अंहकार गेला त्या दिवशी आपले जीवन सुंदर होईल.
मी कुणीच नाही हा भाव आपल्यात असला पाहिजे पण आता सगळं उलटं झालिं आहे.आता प्रत्येकाला मान सन्मान पाहिजे हि मनस्थिती झाली असून,आपण हे जीवन सुंदर जगले पाहिजे माणूस जन्माला येण्याच्या आगोदर नऊ महिने चाहूल लागलेली असते पण मृत्यूची चाहूल एक क्षणही मिळत नाही.त्यामुळे हे जीवन माणसाने सुंदर जगले पाहिजे असेही त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रसिध्द कवी प्रा.सय्यद अल्लाऊद्दीन,युवा कवी युवराज वायभसे,तसेच प्रसिध्द कवी हरिष हाथवटे यांनी आपल्या कविता सादर केल्या.हारिष हाथवटे यांनी गाव नावाची कविता सादर करून गावाचे महत्व समजून सांगत टिचभर पोटासाठी गाव सोडून होई रान हि कविता सादर केली.तर युवाकवि युवराज वायभसे यांनी “कवा येणार बाबा व्हंय भेटीला” हि कविता सादर करून आपल्या आयुष्यात वडिलांचे महत्व आणि मुलांकडून वडिलांची आपेक्षा भंग कसा होतो हे सांगितले.