आष्टीत उद्या सावरकर गौरव यात्रा-माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी-भाजपकडून राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर “गौरव यात्रा” काढण्यात येत आहे.याच धर्तीवर आष्टी विधानसभा मतदार संघात भाजपचे ज्येष्ठ नेते मा.आ.भीमराव धोंडे यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा उद्या गुरुवार दि.६ एप्रिल रोजी होणार आहे.आष्टी विधानसभा मतदार संघातील भाजप,शिवसेना पदाधिकारी,अराजकीय नागरीक,कार्यकर्ते सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार होणारा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही.त्यांचे बलिदान, त्याग कधीही विसरता येणार नाही.त्यामुळें जे जे सावरकरांचा अपमान करत आहेत.त्यांना सडेतोड उत्तर म्हणून वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन राज्यभर शिवसेना आणि भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.आष्टी शहरात ही आम्ही सारे सावरकर या शीर्षकाखाली यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.मतदार संघातील संघटनांना एकत्र करून भाजप-शिंदे शिवसेनेकडून शहरात गुरुवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आष्टी शहरातील माजी आ.भीमराव धोंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून “गौरव यात्रा” काढण्यात येणार आहे. यात सर्व हिंदू संघटना,देशप्रेमी,सावरकर प्रेमी,भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते,जिल्हा परिषद सदस्य,सभापती,उपसभापती,पंचायत समिती सदस्य,बुथ प्रमुख,गट प्रमुख,गण प्रमुख,सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,अराजकीय नागरीक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले आहे.