व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

हनुमंतगाव येथे आज बबन महाराजांचे काल्याचे कीर्तन आणि मेहेर ज्वेलर्सतर्फे महापंगत

मोठ्या संख्येने उपस्थित राहा-संंतोषशेठ मेहेर

0

आष्टी-तालुक्यातील हनुमंतगाव येथे श्रीराम जन्मोत्सव व हनुमान जन्मोत्सवनिमीत्त सालाबादप्रमाणे याहीवर्षी वै.संत मदन महाराज बिहाणी यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह.भ.प.आजिनाथ महाराज झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.३० मार्च ते दि.७ एप्रिल या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.या सप्ताहात काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,गाथाभजन, प्रवचन,हरिपाठ,हरिकिर्तन व हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम झाले आहेत.आष्टी शहरातील मेहेर ज्वेलर्स,बालाजी ट्रेंडर्स,मेहेर कलेक्शनचे मालक सोने चांदीचे प्रसिध्द व्यापारी संतोषशेठ मेहेर,विजयशेठ मेहेर आणि मेहेर परिवार गेली २८ वर्षापासून आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात स्व.पू.प्यारीबाई गोकुळदास मेहेर आणि स्व.जयकुमार मेहेर यांच्या स्मरणार्थ काल्याचे कीर्तन व काल्यानंतरच्या महापंगतीचा महाप्रसादाचे वाटप करतात.सामाजिक व धार्मिक कार्यात ते नेहमी आघाडीवर असतात.मेहेर कुटूंबाने कोरोना साथीच्या आजारातही मदतीचा हात देत आधार दिलेला आहे.
हनुमान जन्मोत्सवनिमीत्त सालाबादाप्रमाणे शुक्रवार दि.७ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ यावेळात कडा येथील संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे किर्तन होत आहे.काल्याचे कीर्तनानंतर सालाबादप्रमाणे महाप्रसादाची महापंगत आष्टीचे प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी मेहेर ज्वेलर्सचे संचालक संतोषशेठ मेहेर आणि विजयशेठ मेहेर यांंच्यातर्फे होणार आहे.किर्तनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोषशेठ मेहेर,विजयशेठ मेहेर,अमोल भंडारी,अभिजित,अक्षय,श्रेयस,आकाश,ऋतिक मेहेर यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.