होय मी सावरकर…!भव्य सावरकर गौरव यात्रा; व भाजप स्थापना दिनानिमित्त मा.आ.धोडेंच्या हस्ते ध्वजारोहण
दुर्मिळ अशक्य गोष्ट सावरकरांनी पूर्ण केली त्यांचे राष्ट्रकारण खुप तेजस्वी होते - मा.आ.भिमराव धोंडे
आष्टी-देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावरकर यांचे खरे जीवनचित्र समाजापुढे यावे या दृष्टीने भाजपतर्फे आष्टी मतदारसंघात मा. आ. भिमरावजी धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता आष्टी शहरातील मा.आ.धोंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून ते महेश मल्टीस्टेट को- ऑप बँकेपर्यंत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.मा.आ.भिमरावजी धोंडे यांनीआपल्या भाषणात दुर्मिळ अशक्य गोष्ट सावरकरांनी पूर्ण केली त्यांचे राष्ट्रकारण खुप तेजस्वी होते.असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकत्यांनी मी सावरकर’या आशयाच्या टोप्या परिधान केल्या होत्या भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त संपर्क कार्यालया समोर मा. आ. धोडेंच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या रॅलीत सभास्थळी प्रत्येक नेते पदाधिकारी मी सावरकर अशा अशायाच्या टोप्या भारतीय जनता पार्टी चे ध्वज, पंचे परिधान करून उपस्थित होते. महेश बँकेच्या प्रांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. वाल्मिक तात्या निकाळजे, साहेबराव म्हस्के, श्रीधरपंत सहस्रबुद्धे, युवा नेते अजय धोंडे, सुनिल सानप, दादा झांजे आदींनी मनोगत व्यक्त केले. या गौरव यात्रेत मा.आ.भिमरावजी धोंडे, युवा नेते अजय धोंडे,अभयराजे धोंडे, अॅड. वाल्मिक तात्या निकाळजे, जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख, बबन झांबरे, भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. साहेबराव म्हस्के, डॉ.शैलजा गर्जे, अॅड. नवनाथ विधाते, सरपंच सावता ससाणे, रघुनाथ शिंदे, सरपंच दादा जगताप, सरपंच अभय गर्जे,महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस,नगरसेवक ज्ञानदेव राऊत,बाबु कदम,दादा झांजे,बबन औटे,दत्तात्रय गिलचे,नवनाथ सानप, बाळासाहेब पवार,सरपंच विष्णू दहिफळे,सरपंच ज्ञानेश्वर वाघ,संजय मिसाळ, सुनिल सानप, आदींसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंकर देशमुख यांनी तर आभार बाळासाहेब पवार यांनी मानले माजी जन्मठेप या पुस्तकाचे प्रत्येकाने वाचन करण्याचे आवाहन मा.आ.भिमरावजी धोडे यांनी शेवटी केले.