व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

दुचाकी-कार समोरासमोर धडक एक जण ठार,एक जखमी;आष्टी तालुक्यातील धामणगांव जवळील घटना

0

आष्टी-दुचाकी आणि कारचा समोरासमोर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक जखमी झाल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान धामणगाव येथे घडली.शुभम चौधरी (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील शुभम गोरख चौधरी (२२), विठ्ठल अशोक चौधरी (२३) हे दोघेजण गुरूवारी सकाळी दुचाकीवरून अहमदनगरला गेले होते.काम आटोपून दोघेही सायंकाळी घराकडे निघाले. याचेवली बीडवरून पुण्याला एक कार (क्रमांक जीजे ०१ डब्लूए ०९८९ याच मार्गे येत होती.बीड-धामणगाव रोडवर दुचाकी आणि कारची समोरासमोर जोराची धडक झाली.यात दुचाकीवरील दोघेही तरुण गंभीर जखमी झाले.उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यात शुभम याचा मृत्यू झाला.तर गंभीर जखमी विठ्ठल चौधरीवर अहमदनगर येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.शुभम चौधरी वर शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.