व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यात गारपीटचा तडाखा;नुकसान तात्काळ पंचनामे करण्याच्या आ.आजबे यांचे प्रशासनाला सूचना

0

आष्टी-तालुक्यातील हारेवाडी,मराठवाडी,पिपळगाव घाट,अरणविहरा, शेडाळा,देऊळगाव या भागात शनिवारी सायंकाळी ६.१५ मि.अतिवृष्टी गारांसह जोरात पाऊस झाला.या भागातील शेतकऱ्यांची पिके सुपडासाफ झाली असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे.या गारपीटात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करुन महसुल प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांंच्याकडे आ.बाळासाहेब आजबे यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त भागाची माहिती घेत आपत्तीग्रस्तांना आधार देऊन, जिल्हाधिकारी,तहसीलदार,कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक तेथे आपतग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना आ.आजबे यांनी दिल्या.

शनिवारी दि.१५ रोजी सायंकाळी पाच ते साडेपाच च्या दरम्यान अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे दौलवडगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये पिकांना फटका बसला आहे.पिंपळगाव घाट,देऊळगाव घाट,हरेवाडी,मराठवाडी येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बियाण्यासाठी तयार केलेले गोट तसेच जनावरांसाठी खाद्य म्हणून तयार केलेले मका आणि कडवळ तसेच काही ठिकाणी डाळिंबाच्या बागांवर या गारपीटीमुळे फार मोठा परिणाम झालेला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ.बाळासाहेब आजबे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.