व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

सऊदाह जिया बेग या ७ वर्षीय चिमुकलीचा पहिला रोजा पूर्ण

आ.सुरेश धस यांनी केले कौतुक

0

आष्टी-सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे.रमजानच्या या महिन्यात मुस्लिम बांधवाना निरंक उपवास असतात.आष्टी नगरपंचायतचे नगरसेवक जिया बेग यांच्या ७ वर्षीय मुलीने शुक्रवारी या पवित्र दिनी रोजा पूर्ण करून आपला पहिला उपवास पूर्ण केला.एवढ्या लहान वयात कडक उन्हाळ्यात रोजा पूर्ण केल्याबद्दल आ.सुरेश धस यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन कौतुक करत सऊदाह व संपुर्ण बेग परिवाराला रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या.
आष्टी येथील नगरपंचायतचे नगरसेवक जिया बेग यांची मुलगी सऊदाह जिया बेग (वय ७ वर्ष) चिमुकलीने आपला आयुष्यातील पहिला रोजा शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी पूर्ण केला.प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे आपले सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.प्रत्येक धर्माच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व असते.तसेच प्रत्येक धर्माच्या सणाचे महत्व व वेगवेगळे संदेश दिले जातात.मुस्लीम बांधव पवित्र रमजानच्या महिन्यात पहाटे ४:४५ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत पाणी,अन्न काहीही ग्रहण केले जात नाही.त्यात या वर्षी एप्रिल महिन्याच्या रखरखत्या उन्हाळ्यात रमजानचा महिना आल्याने उपवास ठेवणे खूप कठीण असतानाही सऊदाहने एवढ्या लहान वयात कडक उन्हाळ्यात रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे आ.सुरेश धस यांनी कौतुक केले.यानिमित्ताने आष्टी शहरातील मुस्लिम बांधवासाठी नगरसेवक जिया बेग आणि बेग कुटूंबाकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी जि.प.शिक्षण सभापती नियामत बेग,डॉ.बेग,जि.प.सदस्य माऊली जरांगे,गणेश शिंदे,नगरसेवक असिफ सौदागर,सय्यद तय्यब सर,नगरसेवक शरीफ शेख,नगरसेवक समीर शेख,मुजीब सर,हरेश चाऊस,समीर बेग, युनूस शेट,नगरसेवक ईशान खान,इंजि.अत्तहर बेग,पत्रकार प्रविण पोकळे,दत्ता हुले,डॉ.सिद्दीक बेग,जुनेद शेख आदींसह हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.