सटलमेंट राजकारण्याची;कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ.धस १३ आ.आजबे २ माजी आ.धोंडे २ तर माजी आ.साहेबराव गटाला एक जागेचा फाॅर्म्यूला ठरला..?
आष्टी तालुक्यात चर्चा
आष्टी-संपूर्ण जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे वातावरण तापले आहे.माञ आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक न होता सटलमेंट होऊन जागा वाटपाचा फाॅर्म्यूला ठरला असल्याची चर्चा सुरू असून,आ.सुरेश धस यांच्या १३ राष्ट्रवादीचे विद्येमान आ.बाळासाहेब आजबे यांनी आ.सुरेश धसांना कसलाच विरोध न करण्याची जणू काय?शपथच घेतली असून,विद्येमान आमदारांनी लढत देण्याऐवजी १८ जागा लढण्यापेक्षा दोन जागा फुकटात घेऊन सामाधान मानण्याच्या तयारीत आहेत.तर माजी आ.भीमराव धोंडे यांना दोन जागा तर माजी आ.साहेबराव दरेकर यांना एक जागा देऊन त्यांची बोळवण करण्यात येणार आहे.त्यामुळे बिनभोबाट कडा कृषी उत्पन्न बाजार समितीवर आ.सुरेश धस यांचे वर्चस्व राहणार असल्याचे चिञ सध्याच्या तरी राजकारणावरून दिसत आहे.
आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायतीमधून ४ संचालकांसाठी ११५२ मतदार आहेत.सेवा सहकारी सोसायटीमधून ११ संचालकांसाठी ६२४ मतदार, हमाल मापाडी २ संचालकासाठी २२४ मतदार होते. ती जागा बिनविरोध काढण्यात आली. घस गटाचे राजू हुलगे बिनविरोध झाले आहेत.व्यापारी वर्गातून संचालकांसाठी २ जागा आणि ३४० मतदार अशा १८ जागा व २३४० मतदार संख्या आहे.ग्रामपंचायत,सेवा सोसायटीच्या निवडणुकीसह हमाल,मापाडी, व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे.भाजपचे विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या गटाच्या ताब्यात कडा बाजार समिती आहे.सध्याच्या निवडणुकीसाठी १८ जागांसाठी ५८ अर्ज दाखल झाले आहे.भाजपचे सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर व राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे हे निवडणुकीत सक्रिय झाले आहेत.परंतु या सर्वांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तडजोडींवर भर दिला आहे.
असा ठरला फाॅर्म्यूला…
संख्याबळ धस यांच्याकडे आहे. बाजार समिती निवडणुकीत आ.धस याच्याकडे १३ जागा,व आ.आजबे व माजी आ.धोंडे यांना प्रत्येकी दोन,तर माजी आमदार साहेबराव दरेकर एक अशी वाटाघाटी होण्याच्या हालचाली सुरू आहे.यामुळे निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे, अशी चर्चा राजकीय गोटात आहे.असे असले तरी दोन दिवसात काय तडजोडी होतात यावर निवडणुकीचे भवितव्य ठरणार आहे.