व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

गंभीर-दुखण्याचा त्रास कमी करण्याच्या नावावर रुग्णांच्या जिवाशी खेळ

बोगस डॉक्टरांचा हाय पेनकिलर रुग्णांना बनवतोय किडनी आजाराचा शिकार

0

आष्टी-गंभीर आजाराचे दुखणे कमी करण्याच्या नावावर गाव खेडयात बस्तान बसवलेल्या झोला छाप डॉक्टर कडून उच्च पॉवरच्या पेनकिलर गोळ्या देण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांना किडनी सारख्या गंभीर आजाराला तोंड द्यावे लागत असून यामुळे अनेकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला असतांना तालुका आरोग्य विभाग मात्र या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाची आरोग्य पाहिजे,त्या प्रमाणात वेळेवर उपलब्ध होत नसल्याने परिणामी याच संधीचा फायदा घेत गाव खेडयातील भाबडया,अशिक्षित रुग्णांना गंभीर आजारावर तत्काळ आराम व वेदना कमी करण्याचे आमिष दाखवून बोगस डॉक्टर जादा प्रमाणात व उच्च परिच्या पेन किलर गोळ्या औषधे,बेसुमार व अनियंतरितपणे उपचार करीत आहेत.या बोगस डॉक्टरांच्या उपचाराने रुणांचे दुखणे कमी होत आहे. परंतु बोगस डॉक्टरांनी केलेल्या औषधाने रुणांना किडनी सारखा आजार जडून मृत्यु आपल्या कवेत घेत असल्याचे दिसत आहे.या प्रकरणाची सर्व माहिती असतांना तालुका आरोग्य विभाग मात्र या बोगस डॉक्टरांवर कारवाई न करता त्यांच्या जिवासी खेळण्यास अभय देत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.याबाबत आम्ही आष्टी तालुका आरोग्य अधिकारी जयश्री शिंदे यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क न झाल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

कोरोना काळात चुकीच्या उपचाराने दगावला होता रुग्ण
——————————————————————
आष्टी तालुक्यातील कडा या ठिकाणी असलेल्या बोगस डॉक्टरने एका कोरोना बाधित रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार केले होते.त्यामुळे त्या रुग्णाची प्रकृती खालावून कोरोना आजाराचे उपचार वेळेवर न मिळाल्याने या मासणाची प्राणज्योत मालवली होती.तेव्हा सुद्धा तालुका आरोग्य अधिकार यांनी कोणतीच ठोस कारवाई या बोगस डॉक्टरांवर केली नाही.त्यामुळे डॉक्टर निर्धास्तपणे रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत.आष्टी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जिवाशी खेळ चालू असून तालुका आरोग्य विभागाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु आरोग्य विभाग या बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे.
———————————————————————————————————————
बोगस डॉक्टरांवर कारवाई करणार ?
————————————————
नागरिकांनी बोगस डॉक्टरांच्या आजपर्यंत केलेल्या तक्रारीची दखल घेवुन तालुक्यातील अनधिकृत दवाखाने थाटलेल्या सर्वच बोगस डॉक्टर कारवाई केल्या जातील.
-सुधाकर मुंडे, गटविकास अधिकारी तथा अध्यक्ष तालुका बोगस डॉक्टर प्रतिबंध समिती आष्टी
————————————————————————————————————————
अन्यथा मनसे स्टाइलने बंदोबस्त करू
—————————————————
आष्टी तालुक्यात बोगस असून आरोग्य विभागाने यावर कारवाई करणे गरजेचे आहे.आरोग्य विभाग या बोगस डॉक्टरांना पाठाशी घालण्याचे काम करीत आहे.येत्या सात दिवसात या बोगस डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाइलने करून या बोगस डॉक्टराचा बंदोबस्त करू.
-कैलास दरेकर,महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष
————————————————————————————————————

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.