आष्टी तालुक्यातील तीन मजूरांचा ञ्यंबकेश्वरमध्ये मृत्यू
पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या मजूरांवर काळाचा घाला
आष्टी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात विहिरीचे खोदकाम करताना झालेल्या स्फोटात आष्टी तालुक्यातील धिर्डी येथील एक व बोरूडवाडीच्या दोन असे एकूण तिघांचा मृत्यू दि.१८ रोजी रात्री साडे आठ सुमारास घडली घटना या मयत झालेल्या व्यक्तीवर नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून,बुधवारी राञी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोलमजूरी करून आपल्या कुटूंबीयांची उपजिवीका भागविण्यासाठी विहीरीच्या कामावर मजूरी करण्यासाठी सतत बाहेरगावी राहणा-या तीन मजूर विहीरीचे खोदकाम सुरू असतांना झालेल्या स्फोटात आपला जीव गमवावा लागला हि घटना मंगळवार दि.१८ रोजी राञी ८.३० च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील ञ्यंबकेश्वर तालुक्यात हिरडी या गावात घडली.या तिघां मयतांवर नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून,राञी उशीरा त्यांच्यावर अत्यंससंस्कार करण्यात आले.आष्टी तालुक्यातील धिर्डी येथील बिबीषण शामराव जगताप वय (४०)येथील रहिवासी असून,त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी,दोन मुले,आई,वडील असा परिवार आहे.तर दोघे जण धामगणांव जवळील बोरूडवाडी येथील लहू जालिंदर महाजन वय (३९)व आबा उर्फ पिनू एकनाथ बोराडे वय (३६) रहिवासी आहेत.
लहू आणि पिनू आठ दिवसापुर्वीच आले होते गावाकडे
दरम्यान बोरूडवाडी येथील लहू महाजन व पिनु बोराडे हे आठ दिवसापुर्वीच म्हणजे हनुमान जयंती निमित्त धामणगावच्या याञेसाठी गावाकडे आले होते.याञे निमित्त येऊन येथून दोन दिवसापूर्वीच ते मोलमजूरी करण्यासाठी ञ्यंबकेश्वर कडे रवाना झाले होते.