सर्व समाजाला व विरोधकांना न्याय देत कडा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध काढण्यास आ.धसांना यश
आ.धस १२,माजी आ.धोंडे ३,आमदार आजबे ३ असे जागा केल्या वाटप
आष्टी-गेल्या पंचवीस वर्षापासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात असलेली कडा कृषी उत्पन्न बाजार समिती याही वर्षी आपल्या ताब्यात ठेवण्यास आ.धस यशस्वी ठरले असून,सर्व समाजाला व विरोधकांना न्याय देत कडा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्यास आ.सुरेश धस यशस्वी ठरले आहेत.
गेल्या महिनाभरापासून कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीचे बिगूल वाजले असून,सर्व जिल्हाभरात बाजार समितीच्या निवडणूकीचे वारे वाहत असतांना आ.सुरेश धस यांनी आज दि.२० एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण बाजार समितीच बिनविरोध काढली आहे.यामध्ये आमदार सुरेश धसांनी सर्व सामाजाचे प्रतिनिधीत्व तर दिलेच शिवाय विरोधकांनाही फुकटात तीन-तीन जागा देऊन आपला मोठेपणा सिध्द केला.यामध्ये आमदार सुरेश धस गटाचे
रमजान तांबोळी,संजय बलभीम ढोबळे,अशोक मोहन पवार,रामशेठ बाळनाथ मधुरकर,वंदना परिवंत गायकवाड,बुवासाहेब सुभाष शेकडे,राजू मुरलीधर हुलगे,संजय कांतीलाल मेहेर,जयश्री तळेकर,शेंडगे रामदास भगवान,मुरलीधर फसले,छाया अशोक लगड
माजी आ.धोंडे गटाचे नामदेव आनंदराव धोंडे, अण्णासाहेब लांबडे,बेबीनंदा भगवान नागरगोजे
आ.आजबे गटाचे पंडित पोकळे,मधुकर सायंबर,राजेंद्र गव्हाणे यांचे अर्ज राहिल्याने हे संचालक मंडळ बिनविरोध झाले आहे.
आमदार आजबेंवर आ.धस मेहेरबान
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या पंचवीस वर्षापासून आ.सुरेश यांच्या ताब्यात बिनभोबाट येत असून,त्यांनी बाजार सामितीचा तसा कायापालटही केला आहे.या निवडणूकीत आमदार आजबेंवर आमदार धसांनी मोठेपणा दाखवत तीन जागा दिल्या.यावर आमदार आजबेंनीही आपली हुशारी वापरत मोकार लढत देऊन उपयोग होणार नाही.त्यामुळे लढवून एकही जागा न येण्यापेक्षा फुकटात तीन जागा मिळाल्याने आ.आजबेंवर आ.धस मेहेरबान झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
माजी आ.धोंडेनीं बिनविरोध निवडणूकीत लावला भावाचा नंबर
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार सुरेश धस,आ.बाळासाहेब आजबे यांनी कार्यकर्त्यांना महत्व दिले.पण माजी आ.भीमराव धोंडे यांनी या बिनविरोध निवडणूकीत आपल्या गावाकडे असलेल्या भाऊ नामदेव आनंदराव धोंडे यांना उमेदवारी दिली.अन् या बिनबिरोध निवडणूकीत आपल्या सख्या भावाचा नंबर माजी आ.धोंडे यांनी लावला आहे.अशी चर्चा सुरू होती.
क्लिक2आष्टीचा अंदाज ठरला खरा
गेल्या चार दिवसापुर्वीच कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत सेंटेलमेंट राजकारण्याची या माथाळ्याखाली प्रसिध्द करण्यात आली होती.यामध्ये आ.धस गट १२,आ.आजबे २,माजी आ.धोंडे २ व माजी साहेबराव दरेकर एक अशी होऊन बिनविरोध होणार असल्याचा अंदाज प्रसिध्द केला होता.तो आज खरा ठरला आहे.