होय,१९ नोव्हेंबरलाच उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय रस्ते मंत्री नितिन गडकरी येणार
बीडच्या नेत्यांनी नगरच्या नेत्यांचा आदर्श घ्यावा
आष्टी-अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून १९ नोव्हेंबरला केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे यांनी सोमवारी नगरमध्ये येऊन उड्डाणपुलाच्या कामाची अधिकान्यांसोबत पाहणी केली.खासदार यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप यांनीही उड्डाणपुलावरून वाहनाने प्रवास केला.तेव्हा ते होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली येथील अधिकारी एस.के.मिश्रा,अशिष आसाटी,पी.जी. खोडस्कर,अंशुमती श्रीवास्तव,प्रफुल्ल दिवाण,एम.एस. वाबळे,दिपेंद्र राठोड,दिग्विजय पाटणकर,क्रिशेंद्रा ड्रीवेदी, राजा मुखर्जी,महेश मिश्रा,दिबॅड पॉल,अलोक कुमारसिंग, संदीप पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.खासदार डॉ.सुजय विखे महणाले, उड्डाणपुलाच्या माध्यमातून नगरकरांच्या स्वप्न पूर्ण झाले आहे.मी व आमदार संग्राम जगताप आम्ही दोघांनीही जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे.या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या सौंदर्यकारणात भर पडली आहे. या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी देखील उड्डाणपूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.दि.२० नोंव्हेबर नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल असे खा.विखे यांनी सांगीतले.यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले,उड्डाण पुलाच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडली आहे.
लोकार्पणाच्या दिवशी सायंकाळी आतिषबाजी
———————————
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या दिवशी रात्री उड्डाणपुलावर आतषबाजी करण्यात येणार आहे.यासंदर्भात खासदार विखे पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत.
————————————————————————
बीडच्या नेत्यांनी नगरच्या नेत्यांचा आदर्श घ्यावा
———————————
कोणत्याही विकास कामात राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकञ येत शहराचा मतदार संघाचा विकास कसा होईल.याबाबत नेहमीच नगर जिल्ह्यातील नेत्यांकडे पाहिल्यावर दिसून येते.पाण्याचा,ऊसाचा किंवा रस्ताचा प्रश्न असला की,नगरचे सर्वच नेते एकवटतात पण आपल्या बीड जिल्ह्यात व मतदार संघात माञ तसे दिसूम येत नाही.आपल्या बीड जिल्ह्यातील नेत्यांनी विकासासाठी तरी एकञ येण्याची गरज असून नगर जिल्ह्यातील नेत्यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे.
——————————————————————