व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

नवरा गाणं म्हणत नाही म्हणून बायकोने केली पोलिसांत तक्रार

0

क्लिक2आष्टी आपडेट-नवरा-बायकोमधील भांडणे नेहमीच ऐकायला आणि पाहायला मिळतात.अनेक वेळा हे भांडण इतके टोकाला जाते की ते पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचते.यानंतर ते समन्वयाने सोडवले जाते.आता असाच एक प्रकार समोर आला आहे,ज्यामुळे पोलिससुद्धा चकित झाले आहेत.हा सर्व प्रकार नवरा-बायकोच्या भांडणाचा आहे. मात्र,नंतर नव-याला पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण मिटवण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी,एक महिला तिची तक्रार घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली होती की तिचा नवरा तिच्यासाठी गाणी गात नाही.महिलेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिस काही काळ विचारात पडले.यानंतर त्या महिलेची तक्रार लक्षात घेऊन तिच्या नव-याला पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले.तुमच्या बायकोने तुमच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे,असे त्याला सांगण्यात आले.
यानंतर पोलिस स्टेशनमध्येच नव-याने बायकोला शांत करण्यासाठी आतिफ अस्लमचे गाणे गायले.पती जेव्हा तिच्यासाठी गाणं म्हणत होता तेव्हा पत्नी समोर उभी राहून ते ऐकत होती. यादरम्यान कोणीतरी त्यांचा व्हिडिओ शूट केला इंटरनेटवर अपलोड केला.यानंतर नवरा-बायकोचे भांडण पोलीस ठाण्यातच मिटल्याचे सांगितले जात आहे.रिपोर्टनुसार,ही घटना झाशीतील पोलिस ठाण्यात झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.