व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

15 व्या वित्त आयोगाच्या निधीवरून दोन भाजपा नेत्यांची पंचायत समितीत हामरी-तुमरी

गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी मध्यस्ती करत मिटवला वाद

0

आष्टी-पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीच्या कामा संदर्भात येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात आलेल्या भाजपाच्या दोन माजी पदाधिका-यांन मध्ये हामरी-तुमरी झाली.मंगळवार दि.1 रोजी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी यांच्या दालनात हा प्रकार घडला या प्रकाराची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
याबाबत अधिक असे की,पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत व पंचायत समातीला शासनाकडून विकास कामासाठी निधी देण्यात येतो.ग्रामपंचायतीला लोकसंख्येनुसार निधी शासनाकडून येतो.या निधीच्या खर्चात आष्टी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी मनमानी पणे खर्च केल्याचे तसेच कामे न करताच बिले उचलण्याचे अनेक तक्रारी चव्हाट्यावर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर 15 व्या वित्त आयोगाच्या कामांबाबत गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंगळवार दि.1 रोजी दुपारी दोनच्या सुमारास भाजपाचे एक माजी जिल्हा परिषद सदस्य दालनात आले होते.यावेळी तिथे भाजपाचे अन्य एक पंचायत समिती सदस्याचा दिर तिथे आले या दोघांमध्ये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यासमोर जोरदार बाचाबाची झाली.अचानकपणे घडलेल्या घटनेची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न दस्तूरखुद्द गटविकास अधिकारी मुंडे यांनी करत घडलेल्या प्रकरनावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.या प्रकराची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.या झालेल्या सदरील घटनेची माहिती घेण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची बाजू कळू शकली नाही.

ते दोन भाजपाचे माजी पदाधिकारी कोण?
————————————————
मंगळवारी झालेल्या पंचायत समिती कार्यालयात प्रकारात दोन भाजपाचे माजी पदाधिकारी कोण?व हा वाद नेमका कशामुळे झाला याबाबत दिवसभर चवीने चर्चा सुरू होती.
—————————————————————————————————————————
अलबेल कारभाराची चौकशी करा-मनसे
————————————————
पंचायत समितीमध्ये अनेक कामांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार करीत ब-याच कामात अनियमिता आहे.तर मगरेगा सारख्या विहीर कामांसाठी तर स्वत;गटविकास अधिकारी पैसे मागत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.व पंचायत समितीमध्ये या आगोदरही पदाधिका-याच्या हामरी तुमरी चे प्रकार घडले आहेत.एवढ्या मोठ्या कोट्यावधी रूपायाच्या नविन पंचायत समिती कार्यालयात सीसीटिव्ही असेल तर कालचा प्रकारही कैद झाला असेल तरी या पंचायत समिती कारभाराची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी केली आहे.
——————————————————

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.