जिल्ह्यात भाजपाची लाज आमदार धसांनी राखली;कडा/पाटोदा बाजार समितीवर धसांची पकड
कड्यात बिनविरोध १३ तर पाटोद्यात लढवून १३ जागा घेतल्या ताब्यात
आष्टी गणेश दळवी-बीड जिल्ह्यात आष्टीसह पाटोदा,बीड,गेवराई,वडवणी,परळी,आंबाजोगाई आणि केज या ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका संपन्न झाल्या.यामध्ये बीड,गेवराई,वडवणी, परळी व आंबाजोगाई या पाच ठिकाणी महाविकास आघाडीचे वर्चस्व आले.तर केज मध्ये आडसकरांनी बाजी मारली.अन् कडा बाजार समिती तर आ.धसांनी बिनविरोध काढली व पाटोद्यात १८ पैकी १३ जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीचा विजरथ रोखत जिल्ह्यात भाजपाची लाज आ.धसांनी रोखली असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील महिन्यात निवडणूका जाहिर होऊन काल मतमोजणी होऊन निकाल जाहिर झाले.यामध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे होमपिच असलेल्या परळीत १८ पैकी १८ जागा धनजंय मुंडे यांनी काबीज केली.तर गेल्या वीस वर्षापासून आंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राष्ट्रववादीच्याच ताब्यात असून,आ.नमिता मुंदडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने बदल होईल असे वाटत होते.परंतु पुन्हा हि बाजार समिती धनजंय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली १८ पैकी १५ जागा मिळवत राष्ट्रवादीच्या ताब्यातच राहिली.दुसरीकडे ३५ वर्षापासून थोरल्या क्षिरसागरांकडे असलेल्या बाजार समितीत धाकल्या क्षिरसागरांनी सुरूंग लावत १८ पैकी १५ जागा मिळवून महाविकास आघाडीचा विजय झाला.गेवराई मध्ये माजी आ.अमरसिंह पंडीतांनी १८ पैकी १८ जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली.
आ.धसांनी व अडसकरांनी भाजपाची लाज राखली
जिल्ह्यातील आठ बाजारसमिती पैकी पाच बाजार समितीवर भाजपाचा सुफडा साफ झाला.पंकजा मुंडे,लक्ष्मण पवार,जयदत्त क्षिरसागर,यांना सुध्दा आपले बालेकिल्ले संभाळता आले नाही.माञ केजमध्ये रमेश आडसकरांनी १४ जागा जिंकून बाजारसमितीवर विजय मिळवला तर आमदार धसांनी कडा मध्ये बिनविरोध १३ अन् पाटोद्यामध्ये लढवून १३ जागा मिळवत जिल्ह्यात आ.धसांनी व आडसकरांनी भाजपाची लाज राखली असल्याचे चिञ दिसत आहे.