व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आता सर्प मित्रांसाठी आचारसंहिता लागू सापांशी खेळ,स्टंटबाजीस मनाई

वनविभाग कार्यालयात करावी लागणार अनिकृत नोंदणी

0

आष्टी-आता सर्पमित्रांसाठीही आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.सर्पमित्रांना सापांशी खेळ व स्टंटबाजी करता येणार नाही.साप आराम करीत असेल तर त्याला त्रास देता येणार नाही.दारू पिऊन साप पकडता येणार नाही.गरज नसताना साप हाताळता येणार नाही.साप पकडताना प्रत्यक्ष बचाव करताना व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही.कोणत्याही कारणासाठी जिवंत सापांचे प्रदर्शन सर्पमित्रास करता येणार नाही.याचे उल्लंघन केल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्पमित्र विरुद्ध कारवाई केली जाणार आहे.
सर्प संरक्षण स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला स्थानिक उपवनसंरक्षक,विभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे.सर्प संरक्षण स्वयंसेवकास सर्पविषयक शास्त्रीय ज्ञान व अनुभव आवश्यक असून अर्जावर संबंधित वन अधिकाऱ्याचे समाधान झाल्यावर त्याचे नाव सर्प संरक्षण स्वयंसेवकांच्या यादीत समाविष्ट होणार आहे.ते नाव जनतेच्या माहितीसाठी प्रसारित केले जाईल.नोंदणीकृत सर्पमित्रांना वनविभागाद्वारे त्यांच्या सेवेसाठी कोणतेही परिश्रमिक दिले जाणार नाही.अत्यावश्यक असेल तेव्हा सर्पमित्रांना तो साप कापडी पिशवीत पकडून ती पिशवी हाताळण्यास,वाहतुकीस योग्य अशा कंटेनर अथवा खोक्यात ठेवावी लागणार आहे.जखमी अथवा नुकतेच खाद्य भक्षण केलेल्या सापाला गडद रंगाच्या कापडी पिशवीत पकडावे लागेल.सर्पमित्रांनी साप दोन वेळा हाताळावा. एकदा पकडताना व दुसऱ्यांदा सोडताना. साप निसर्गात सोडण्यासाठी योग्य सापाला शक्य तितक्या लवकर २४ तासाच्या आत स्थानिक सर्प पुनर्वसन धोरणानुसार वन खात्याच्या मार्गदर्शनाखाली निसर्गात मुक्त करावेत. सर्प बचाव व पुनर्वसन यांच्या नोंदी विहित नमुन्यात ठेवाव्या लागणार आहेत. साप सोडताना त्याच्या नैसर्गिक वावराच्या वेळेनुसार निशाचर साप हे रात्री तर दिनचर साप हे दिवसा सोडावे लागणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.