व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

GST न भरणा-या ग्रामसेवकांच्या मागे लागला चौकशीचा भुंगा;तालुक्यातील १२५ ग्रामसेवकांना वेतनवाढ रोखण्याच्या बिडीओंने दिल्या नोटीसा..

कैलास दरेकर यांनी केली तक्रार

0

क्लिक2आष्टी अपडेट-तालुक्यात १२५ ग्रायपंचायतच्या सर्व कामांच्या GST भरण्याच्या चौकशी करून GST शासनाच्या परिपञकाप्रमाणे न भरणा-या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि.३ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती.या तक्रारीची गटविकाअधिकारी यांनी गंभीर दखल घेत तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांचे वेतनवाढ थांबविण्याच्या नोटीसा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतने सन २०१७-२०२२ पर्यंत १५ व्या वित्तआयोगाअंतर्गत केलेल्या कामनिहाय भरना केलेले GST मोजमाप पुस्तकेतेतील परिणाम प्रमाणे GST भरणा बाबत सखोल चौकशी करून शासनाच्या परिपञकाप्रमाणे GST ची अंमलबजावणी न करणा-या अधिका-यांवर व संबंधित कामे ज्या कंञाटदारांच्या नावे आहेत.आशावर तात्काळ कारवाई करण्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती.या तक्रारीचे गटविकास अधिकारी यांनी दखल घेत आज दि.११ मे रोजी तालुक्यातील १२५ ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना खुलसा सादर करण्याचे दिले असून,सात दिवसांत यावर ग्रामसेवकांनी माहिती सादर न केल्यास अथवा माहिती असमाधानकारक असल्यास वेतनवाढ थांबविण्यात येणार असल्याचे या पञात आदेश देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.