शनिवारी दिवसभर नाही राहणार लाईट;जाणून घ्या कोणत्या भागातील जाणार लाईट
आष्टी येथील उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांची माहिती
क्लिक2आष्टी अपडेट-येथील १३२ के. व्ही. उपकेंद्र आष्टी अंतर्गत येणाऱ्या आष्टी- खर्डा या नवीन वाहिनीच्या कामाकरिता शनिवार १३ मे रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रविण पवार यांनी क्लिक2आष्टी शी बोलतांना दिली.
यावेळी पुढे बोलतांना प्रविण पवार म्हणाले,आष्टी खर्डा या नवीन वाहिनीच्या कामाकरिता १३२/३३/११ के.व्ही.आष्टी उपकेंद्रातून दिलेल्या भागात उद्या शनिवार दि.१३ मे २०२३ रोजी सकाळी सहा ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित राहणार आहे.याची नागरिकांनी दखल घ्यावी.पिण्याचे पाणी,जनावरांसाठी पाणी भरून घ्यावे.विजेवरील कामे वीज खंडित होण्यापूर्वी करून घ्यावी.वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली आहे.