व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

धामणगांवच्या मंडळअधिकारी यांना फेर मंजूर करण्याचा लकवा.!तहसिलदार;कोर्टाचे आदेश असूनही सहा महिन्यापासून फेर प्रलंबितच

0

क्लिक2आष्टी अपडेट-एकीकडे जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या लोकांच्या अडीअडचणी दूर व्हाव्यात म्हणून फेरफार अदालती घेतात पण आष्टी तालुक्यात एखादा कूळ काढण्याचा तहसिलदार यांचा आदेश तर कोर्टाने भाव वाटण्या करून दिलेला आदेश असला तरी धामगांवच्या मंडळअधिकारी यांना माञ,हे फेर मंजूर करण्याची इच्छाच होत नाही.सहा-आठ महिन्यापासून प्रलंबित असलेले फेर ही मंजूर केले नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.या मंडळअधिकारी यांना फेर मंजूर करण्याचा लकवा आहे का? अशी चर्चा या मंडळात सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव मंडळचे मंडळअधिकारी आशा घोडके यांनी पदभार घेतल्यापासून अनेक या मंडळातील फेर मंजूर केले नाहीत.विशेष म्हणजे धामणगांव येथील एका जमिनीचा कुळ काढण्याचा आदेश स्वत;तहसिलदार यांनी दिला.हा आदेश साधारणपणे सहा ते आठ महिन्यापूर्वी दिला होता.परंतु या गावचे तलाठी कावळे यांना विचारले की ते म्हणायचे मी मंडळअधिकारी यांना विचारतो अन् फेर ओढून घेतो.त्यांच्या पाठीमागे लागून लागून तीन चार महिन्याने त्यांना दया आली अन् नंतर फेर मंजूर करण्यासाठी मंडळअधिकारी यांना सहा ते सात महिन्यापासून विनवणी करत पण बघते,करते,बघून घेते असे उडवा उडवीचे उत्तरे देत वेळ मारून नेत.असेच एक प्रकरण सांगवी आष्टी येथील शेतकरी असलेल्या व्यक्तीनीं भाव वाटण्या न्यायालयातून केल्या अन् त्या आदेशाची प्रत तलाठी कावळे यांना दिली पण तलाठी कावळेंचे तेच उत्तर अन् मंडळअधिकारी यांना न्यायालयाचा आदेश असला अन् तहसिलदारांचा आदेश असला तरी काहि फरक पडत नाहि.याबाबतीत बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी लक्ष घालावे अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.कुणाच्या जिवावर चालतो धामणगांवच्या मंडळअधिकारी यांचा रूबाब…(वाचा उद्याच्या भागात)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.