तहसिलदारांच्या कृपेने भरदिवसाच वाळू येते आष्टी शहरात
अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर सा-या गावाने पाहिले पण प्रशासनाला नाही दिसले
आष्टी-तालुक्यात सिना नदी पाञातून भरदिवसाच शहरातील मुख्य बाजारपेठेत तहसिलदारांच्या कृपेने वाळू येत असल्याने आता दाद कुणाला मागायची हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा टाकला आहे.विशेष म्हणजे आज गुरूवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या बांधकामावर अवैध वाळू टॅक्टर येते.हे ट्रक्टर सा-या गावाला दिसले पण तहसिलदार व पोलिसांना नाही दिसले हे माञ विशेष आहे.
जेव्हा पासून आष्टी तहसिलदार पदाचा पदभार तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून तालुक्यात अवैध धंदे बोकाळले आहेत.विशेष म्हणजे वाळू वाल्यांना तर कसलेच भय राहिले नसून,शहरात भर दिवसाच सकाळी साडेअकरा वाजता कमानवेशी जवळ वाळूचे ट्रॅक्टर येऊन वाळू टाकून जाते.हे ट्रॅक्टर सा-या गावाने पाहिले पण महसूल आणि पोलिस प्रशासनाला नाही दिसले हे माञ विशेष आहे.
तहसिलदार गुंड्डमवार म्हणजे असून अडचण नसून….
—————————————————
जेव्हा पासून आष्टी तहसिलचा तहसिलदार पदाचा पदभार तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी स्विकारला आहे.तेव्हा पासून आष्टी शहरासह तालुक्यात खुलेआम दिवसा ढवळ्या वाळू वाहतूक सुरू झाली आहे.तहसिल कार्यालयातही अधिकारी,कर्मचारी हजर नसतात विशेष म्हणजे तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांना तहसिल कार्यालयात येऊन काम करण्यापेक्षा घरूनच काम करायला जास्त आवडते.त्यामुळे हे तहसिलदार म्हणजे आष्टी तालुक्यासाठी असून अडचण,नसून खोळंबा असल्याचे दिसून येत आहे.
———————————————————
पदभार घेतल्यापासून एकही कारवाई नाही
————————————
जेव्हापासून पदभार स्विकारला आहे.तेव्हा पासून एकही अवैध वाळू वाहतूक करणारी मोठी कारवाई या तहसिलदार महाशय साहेबांनी करण्याची तसदी घेतली नाही.उलट अवैध वाळू वाहतुकीवाल्यांना खतपाणी खालण्याचे कामच या तहसिलदार विनोद गुंड्डमवार साहेबांनी इमानेइतबारे केले असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे.
———————————————————————