व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीकरांनो संभाळून..!ज्यादा व्याजदर देणा-या पतसंस्था;बंद पडण्याचा जास्त धोका

जास्तीचे व्याजदर देण्याची जहिरातबाजी:सहकार खात्याचे दुर्लेक्ष

0

क्लिक2आष्टी अपडेट-शहरात बीएच आर,परिवर्तन मल्टीस्टेट,शुभकल्याण मल्टीस्टेट यासह इतर मल्टीस्टेट व पतसंस्थेनी ठेवींदारांना जास्तीचे व्याजदरांचा मोह दाखवून चंबु गबाळ गुंडाळून निघून गेल्या.यानंतर लाखो रूपये ठेवलेल्या ठेवी परत येतील या आशेने काहि जिंवत आहेत.तर काहि जग सोडून निघून गेले आहेत.सहकार संस्थेच्या नियमाप्रमाणे कर्जदाराला १५% अन् ठेवीदाराला जास्तीत जास्त १०% व्याजदर देऊ शकते.अन् जास्तीचे व्याजदर देयचे असेल तर संचालक मंडळाचा ठराव घेऊन द्यावे पण जास्तीचे व्याजदर देणे म्हणजे पतसंस्था बुडण्याची शक्यता अधिक असल्याचे केलेल्या सर्व्हे वरून निदर्शनास आले आहे.त्यामुळे आष्टीकरांनो जास्त व्याजदर घेण्यांच्या मोहात पडू नये,आपली पै-पै जमा केलेली रक्कम गुंतवूण भवताली पाहू नका.
आष्टी शहरात जास्त व्याजदर देणा-या ब-याच पतसंस्था,बाहेरील जिल्ह्यातील मल्टीस्टेट आहेत.यामध्ये गुंतवणूक करताना विचार करून गुंतवणूक करावी नसता आपल्यावर पश्चातापाची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही.मल्टीस्टेट मध्ये गुंतवणूक म्हणजे ना दाद ना फिर्याद या संस्थेला कुणी वालीच नाही.जर मल्टीस्टेट बुडाली तर नेमकं कुणाकडे दाद मागायची कारण यावर नियञंण कुणाचे असते तेच माहित नाही.प्रत्येक मल्टीस्टेट मध्ये स्थानिक कामगार भरून त्यांच्या विश्वासावर लाखो,कोटी रूपये जमा करून घेतात अन् ते कर्मचारी मल्टीस्टेटच्या मुख्य शाखेत कॅश जमा करून टाकतात.एखादा दहा लाखाचा विड्राॅल करायचा असेल तर त्याला दोन दिवस आगोदर तिथे सांगावे लागते.नंतर हेड आॅफिसमधून पैसे येतात.त्यामुळे नागरीकांनी प्रत्येक मल्टीस्टेट व पतसंस्थेमध्ये विचार करून व्यवहार करावा.कोणत्याही पतसंस्थेच्या जास्तीच्या व्याजदराच्या जहिरातीला बळी पडू नये.
एफडीवर लोन करून त्यावरही हाप्ता
शहरात एक मल्टीस्टेट असून,त्या मल्टीस्टेट मध्ये एफडी केली तर मुदतीच्या आत विड्राॅल करायचा असेल तर करता येत नाही.अन् लोन जरी पाहिजे असेल तर तीन दिवस थांबावे लागते.शिवाय आपल्याच पैशावर लोन घेतले अन् दोन महिन्यात एफडीची मुदत संपत असेल तरी त्या ठेवीदाराला कर्जाचा हाप्ता भरावा लागतो.
तरी लोकांनी आशा जास्तीच्या व्याजदराच्या मोहात पडून आपले नुकसान करून घेऊ नये.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.