व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना या शिबिरातून फायदा आणि सुविधा देण्याचे काम-खा.प्रितम मुंडे

संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसाठी पूर्व तपासणी शिबिराचा महायज्ञ-आ.सुरेश धस

0

क्लिक2आष्टी अपडेट-देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेने ही योजना प्रभावी राबवित ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाणार असून दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय चांगली योजना आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना फायदा आणि सुविधा देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या खा.प्रीतम मुंडे यांनी केले.अपंग हा शब्द बदलून दिव्यांग करणारे देशाचे पंतप्रधान मोदी यांचे जाहीर आभार मानतो तर दिव्यांगासाठी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतम ताई मुंडे यांच्या प्रयत्नाने संपूर्ण जिल्ह्यात दिव्यांग बांधवांच्या पूर्व तपासणी शिबिराचे महायज्ञ घेतल्याने त्यांचे जाहीर आभार मानतो असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.
आष्टी ग्रामीण रुग्णालयात सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग,भारत सरकार व जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दिव्यांग पूर्व तपासणी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी आमदार भीमराव धोंडे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के,विजय गोल्हार,सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे,जयदत्त धस,नगराध्यक्ष पल्लवी धोंडे,अशोक साळवे,डॉ.राहुल टेकाळे डॉ.जयश्री शिंदे उपस्थित होते.पुढे बोलताना खा.मुंडे म्हणाल्या,दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचे भाग्य मला मिळत असल्याने मनस्वी आनंद होत आहे. मुंडे साहेबांच्या त्यांच्या घरात जन्म घेतल्याने सामाजिक संवेदनांची जाणीव ही आमच्या जडणघडणे नियमित भाग आहे.आपलं सगळं नीट चाललं असेल आणि दुसऱ्याच्या दुःखाकडे काना डोळ्यात करा असे संस्कार आम्हाला आई-वडिलांनी दिलेले नाहीत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी दिव्यांग हा शब्द नुसता शब्द बदलला नसून तर त्यांच्याकडे समाजाचा दृष्टिकोन धारणा भावना देखील बदललेली आहे.दिव्यांग हा घटक वंचित उपेक्षित असलेला घटक असून धडधाकट असलेल्या आई वडिलांना सांभाळत नसून एकदा दिव्यांग असेल तर त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. अशा दिव्यांगासाठी आपण काहीतरी कार्यक्रम राबवावा असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना वाटले असल्याने ही योजना राबवली जात आहे.या उपक्रमामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.ही योजना केंद्र सरकारकडून राबवली जाणार असून दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय चांगली योजना असून जास्तीत जास्त जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना फायदा आणि सुविधा देण्याचे काम होणार असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,
अपंग हा शब्द बदलून दिव्यांग करणारे देशाचे पंतप्रधान मोदी यांचे जाहीर आभार मानतो.दिव्यांग बांधवांच्या पूर्व तपासणी शिबिराचे महायज्ञ संपूर्ण जिल्ह्यामध्ये घेतल्याने आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आभार मानले पाहिजेत.तसेच गेल्या नऊ वर्षात महाशिबिरांचे आयोजन करत लाखो रुग्णाला फायदा झाला आहे.पंतप्रधान कार्यालयामार्फत आरोग्य सहायता निधीतून अनेक रुग्णांना ५ लाख रुपयांचा फायदा मिळत आहे.आता आजारी पडल्यावर घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सांगत घाबरू नका तुमच्यासोबत हे सरकार असल्याचे आमदार धस यांनी सांगितले.खासदार प्रीतम मुंडे यांचे आभार मानत अतिशय सुंदर कार्यक्रम जिल्हाभर राबवल्याने अनेक दिव्यांग बांधवांचा फायदा होणार असल्याचे शेवटी आ.धस म्हणाले.यावेळी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,जि.प.सदस्य माऊली जरांगे,जि.प.सदस्य अमर निंबाळकर,गणेश शिंदे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुध्दे,जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,शंकर देशमुख,रघुनाथ शिंदे,युवराज वायभासे,रावसाहेब लोखंडे,नगरसेवक शरीफ शेख,आदिनाथ सानप,अशोक मुळे,संजय अजबे,नगरसेवक किशोर झरेकर,सुरेश वारुंगुळे,डॉ.शैलजा गर्जे,जिया बेग,भारत मुरकुटे,सादिक कुरेशी,अंकुश चव्हाण,अविनाश निंबाळकर, सुनील रेडेकर,आत्माराम फुंदे,जालिंदर पोकळे,खंडू जाधव,राजू शिंदे,संतोष रणसिंग,अक्षय धोंडे,दीपक निकाळजे,समीर शेख,दादासाहेब गर्जे,साधू हंबर्डे,संजय ढोबळे,संजय मेहेर,सुनील मेहेर,राजेंद्र जोशी,गिरीश जोशी,ज्ञानदेव वाल्हेकर,नवीन कासवा,अतुल मेहेर,राम मधुरकर,परिवंत गायकवाड,विजय बोगावत,संपत शेळके,शहादुल्ल बेग,बाळु मेहेर,मधुकर नवसूपे,शमशोद्दिन शेख,बापू गुरव,राकेश हंबर्डे,सुनील सानप,रावसाहेब मुटकुळे,प्रवीण कदम,बाळासाहेब बोराडे, सलीम कुरेशी,संदीप येवले,मारुती पवार,संदीप पानसांडे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.राहुल टेकाडे तर सूत्रसंचालन राजेंद्र लाड यांनी केले.
आष्टी तालुक्यात दिव्यांग पूर्व तपासणी शिबीरात लाभ घेतलेल्या दिव्यांग आकडेवारी
अस्थिव्यंग व्यक्ती तपासणी १४३,कर्णबधिर व्यक्ती तपासणी ११२,
मतिमंद व्यक्ती तपासणी १२,अंध व्यक्ती तपासणी ७७,एकुण तपासणी ३५४ Online नोंदणी केलेले व्यक्ती ४०० होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.