राष्ट्रवादी काॅग्रेसचे १२ आमदार फुटले…!समदं ठरलं फक्त मुहूर्त बाकी
आ.शहाजी पाटील यांचे भाष्य
मुंबई वृत्तसेवा-राष्ट्रवादीचे बारा नेते फुटले आहेत, फक्त मुहुर्त ठरायचा आहे. सोलापूरमधील मोठा नेता फुटणार आणि विरोधकांना मोठा दणका बसणार आहे. फक्त थोडं थांबा वाट पहा असा इशारा काय झाडी, काय डोंगार या वाक्याने प्रचंड प्रसिद्धीझोतात आलेले आमदार शहाजी पाटील यांनी आज दिला.शहाजी पाटील म्हणाले,170 आमदार मजबूतपणाने शिंदे फडणवीस सरकारच्या मागे उभे आहेत. सर्व आमदार आपल्या मतदार संघात काम चांगले करीत आहेत. त्यांना निधी मिळत आहे, जनतेची कामे होताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे 12 नेते फुटले आहे पण मुहुर्त अजून ठरला नाही तो लवकरच ठरेल.
तसेच पुढे बोलतांना आ.शहाजी पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील मोठ्यात मोठा नेता लवकरच फुटेल, तो विरोधकांना मोठा दणका बसणार आहे.थोड थांबा पुढे बघा काय होते ते असा इशाराही त्यांनी दिला.