क्लिक2आष्टी अपडेट-एक तर महावितरणाची चोरीची विज वापरायची अन् त्यातही चोरून विज वापरत असलेला लाईटचा अकडा काढला म्हणून भावकित चांगल्याच हाणामारी घडल्या या प्रकरणी शिरूर (का) पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी दि.३०/५/ रोजी सकाळी वावणेबारा वाजता रा. जांब ता.शिरूर (का) येथील राहणारे सूरेखा तुकाराम लव्हाळे वय(३५),हि घरासमोर जनावरांसाठी वैरण काढत असतांना त्यांना त्यांचा लाईटचा आकडा काढलेला दिसला तेव्हा त्यांनी हनुमान लव्हाळे यांना विचारणा केली असता त्यांच्या घरातील चौघांनी येऊन आम्हाला लाथा,बुक्या व काठी अन् ढेकळाने मारहाण केली तसेच काठी डोक्यात मारल्याने रक्तबंबाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी सुरेखा तुकाराम लव्हाळे यांच्या फिर्यादीवरून हनुमान सत्यवान लव्हाळे,आशाबाई सत्यवान लव्हाळे,कल्याण आश्रुबा लव्हाळे,संतोष कल्याण लव्हाळे रा.सर्व जांब,ता.शिरूर कासार यांच्यावर शिरूर पोस्टे मध्ये गुरनं ३९/२०२३ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भांदवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.हे.सानप हे करत आहेत.

महावितरण विभागाने विज चोरणा-यांवर गुन्हा दाखल करावा
दरम्यान विज चोरून वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे.महावितरण विभागाला कोण चोरीची विज वापरत आहे हे पाहण्यासाठी पथक नेमावे लागते.परंतु शिरूर पोलिसांत आयताच चोरीची विज वापरत असलेल्या लाईटच्या आकड्यावरून वाद झाला असून,यावर महाविरण विभागाने कारवाई करून विज चोरणा-यांवर गुन्हा दाखल करावा
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post