राष्ट्रासाठी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगते-शिवशाहीर डाॅ.विजय तनपुरे
रत्नजडीत सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराज…
राज्याभिषेकाची तयारी सुरू…
अन्य राज्यांचे पाहुणे सरदार व
ब्रिटीश अधिकारी लवून मुजरा करताहेत…
आष्टी-“गणेश दळवी”
क्लिक2आष्टी अपडेट-रत्नजडीत सिंहासनारुढ छत्रपती शिवाजी महाराज…राज्याभिषेकाची तयारी सुरू…अन्य राज्यांचे पाहुणे सरदार व ब्रिटीश अधिकारी लवून मुजरा करताहेत…पण सिंहासनाच्या प्रत्येक रत्न व माणकाकडे पाहत महाराजांच्या मनात नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे व असंख्य गमावलेल्या रत्न-माणकांची आठवण अस्वस्थ करतेय…वक्त्याने विलक्षण आवेशात भावनोत्कट मांडलेला हा प्रसंग उपस्थितांना हेलावून जातो… डोळ्यांच्या कडा ओलावतात…राष्ट्रासाठी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगते असे प्रतिपादन शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांनी केले.

आष्टी येथील छञपती शिवाजी महाराज चौक मिञमंडळाच्यावतीने ६जून रोजी राञी ८.३० वा.शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना कार्यक्रमात शिवशाहिर डाॅ.विजय तनपुरे यांनी केले.पुढे बोलतांना तनपुरे म्हणाले,जगावे कसे हे ‘रामायण’ शिकवते,मरावे कसे हे‘महाभारत’ सांगते,तर राष्ट्रासाठी जगावे कसे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगते व राष्ट्रासाठी मरावे कसे हे छत्रपती संभाजीराजांचे चरित्र शिकवते.असे सांगत शिवगर्जना कार्यक्रमात संपूर्ण शिवाजी महाराज समजावून सांगितले.यावेळी शहरातील व्यापारी,राजकीय,पञकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली.

विजय तनपुरे यांची अपंगत्वावर मात
शिवशाहीर विजय तनपुरे पोलिओमुळे एका पायाने अधू आहेत. या शारीरिक त्रासावर मात करून शाहिरी परंपरा जपण्यासाठी त्यांनी झोकून दिले आहे.वयाच्या आठव्या वर्षांपासून ते शाहिरीचे व कीर्तनाचे कार्यक्रम करतात.संत गजानन महाराज,वैष्णो देवी,संत तुकाराम, साईबाबा,मोहटा देवी,महिपती महाराज,तुकडोजी महाराज अशा संतमहात्म्यांच्या जीवनावर त्यांच्या पोवाड्यांच्या १४५ विविध कॅसेट आहेत.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रावरही त्यांची कॅसेट आहे.‘रामायण’सारखे ‘शिवायण’चे सप्ताह गावोगावी व्हावेत व यानिमित्ताने छत्रपती शिवरायांचे चरित्र युवापिढीपर्यंत पोचावे,यासाठी ते प्रयत्न करीत असून अपंगत्वार मात कशी करायची हे हि दाखवून दिले.