व्यापा-याने स्वखर्चातून पोखरी जवळ बॅरिगेटींग बसविण्याचा घेतला निर्णय; अधिका-यांनो अजून किती जीव घेतल्यावर तुम्हाला लाजा वाटणार?
पंधरा दिवसात दुसरा बळी
आष्टी-जामखेड रस्तावरील पोखरी गावाजवळील पुल हा धोकादायक असून,या ठिकाणी असलेल्या पुलावर बॅरिगेटींगच (कठाडा) नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.पण या रस्ताचे ना राजकारण्यांना..ना प्रशासकीय अधिका-यांना सोयरसुतक नाही.या रस्त्याच्या अधिका-यांना अजून किती जणांचे कुटूंब उध्वस्त झाल्यावर जाग येईल ते माहित नाही.पण या रस्तावरील पुलावर जामखेड येथील जलमोती चे व्यापारी आकाश बाफना यांनी स्वखर्चातून बॅरिगेटिंग बसविण्याचा निर्णय घेऊन,कामालाही सुरुवात केली आहे.
चार दिवसापुर्वी जामखेड येथील व्यापारी महेंद्र बोरा यांचा गाडीचा अपघात सकाळी साडेपाचच्या सुमारास पोखरी येथील पुलावर कठाडे नसल्याने गाडी पुलावरून खाली जात या मध्ये महेंद्र बोरा जागीच ठार झाले तर तीन जण जखमी झाले.ह्या आगोदरही येथे भरपूर घटना घडल्या आहेत.पण बांधकाम विभागाला याचे कसलेही सोयर सुतक नाही.अन् आता तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात की,आमचा तर त्या रस्तावर काहिच संबंध नाही कारण तो आता राष्ट्रीय महामार्गाकडे (नॅशनल हायवे)कडे वर्ग केला आहे.त्या नॅशनल हायवे चे अधिकारी माञ,झोपेतच असतात अजून किती जणांचा जीव गेल्यावर यांना जाग येईल.परंतु पोखरी ठिकाणी होत असलेल्या सततच्या अपघाताची पुनारावृत्ती होऊ नये म्हणून जामखेड येथील जलमोती अॅक्वाचे आकाश बाफना यांनी स्वखर्चातून या पुलावर बॅरिगेटींग बसविण्याचे काम सूरू केले.यावेळी आकाश बाफना, दिगंबर राऊत, बाळासाहेब नवसार, अशोक कुमटकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.या छोट्याशा कामामुळे लोकांचे जीव तरी जाणार नाहीत असे आकाश बाफना यांनी क्लिक 2 आष्टी शी बोलतांना सांगीतले.