“लाल लाल पागोट गुलाबी शेला;सौरभ पिंपळकर मेला त्याच्या मौतीला चला..!”
क्लिक2आष्टी-माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून‘तुमचा लवकर दाभोळकर होणार’अशी धमकी देणा-या सौरभ पिंपळगांवकर याचा “लाल लाल पागोट गुलाबी शेला;सौरभ पिंपळकर मेला त्याच्या मौतीला चला..!” घोषणा देत राष्ट्रवादीच्यावतीने निषेध करत आष्टी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तुमचा दाभोळकर करू असा सोशल मिडीयावरून धमकी देणा-या सौरभ पिंपळगांवकरचा आष्टी तालुका राष्ट्रवादी काॅग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.यावेळी विविध घोषणा देत आष्टी तहसिलदार आर.व्ही.शिंदे,पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांना या पिंपळगांवकर याचावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे युवानेते महेश आजबे,तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी,युवक तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले,माजी जि.प.अध्यक्ष डाॅ.शिवाजी राऊत,नगरसेवक नाजीम शेख,ग्रा.प.सदस्य संतोष कदम यांच्यासह राष्ट्रवादी काॅग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.