पैशाच्या वादातून;बीडमध्ये गोळीबार
क्लिक2आष्टी अपडेट-शहरातील कालिकानगर भागात पैशाच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. यात दोन जण जखमी झाले. त्यानंतर एका गटातील आरोपीने दुसऱ्यावर गोळीबार केला.त्यातही दोघे जखमी झाले.रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

आसाराम गायकवाड व सुभाष जाधव यांच्या दोन गटांमध्ये हे वाद झाले. आधी बाचाबाची झाली. नंतर गायकवाडच्या एका साथीदाराने गोळीबार केला. यात जाधव गटाचे गोपाळ भिसे व मणिराम गायकवाड हे जखमी झाले. त्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला होता.पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके आदींनी घटनास्थळी भेट दिली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.आसाराम गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.इतर आरोपी फरार आहे. जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तिथे व कालिकानगरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते.