
क्लिक2आष्टी अपडेट-आमदार सुरेश धस यांच्या आदेशाने आष्टीच्या नगराध्यक्षपदी बेग आयशा इनायतुला यांची निवड करण्यात आली असून,यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अदित्य जीवणे हे होते.यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.
आष्टी नगर पंचायतमध्ये आमदार सुरेश धस हे सर्वांना संधी देत माजी नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांच्या राजीनाम्यानंतर आमदार धस आता कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.परंतु अर्ज भरण्याच्या दि.१९ रोजीच अध्यक्षपदासाठी बेग यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यक्षपदासाठी निवड निश्चित झाली.त्यानंतर मंगळवार दि.२५ रोजी विशेष बैठकीत पिठासन अधिकारी अदित्य जीवणे यांच्या उपस्थितीत बेग आयशा इनायतुल्ला यांची निवड करण्यात आली.यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी धोंडे,गटनेते किशोर झरेकर,रंगनाथ धोंडे,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्ञबुद्दे,नगरसेविका पंखाबाई रेडेकर,फतिमा शेख,सुरेखा वाल्हेकर,भारत मुरकूटे,सुरेश वारंगुळे,नाजिम शेख,शेख शरीफ यांच्यासह मुख्यअधिकारी बाळदत्त मोरे,प्रकाश हरकळ,अजिनाथ गिते यांच्यासह कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.
शहाराच्या विकासासाठी कटीबध्द
आष्टी शहराचा कायापालट आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नाने झपाट्याने होत आहे.येणा-या काळातही आपण आमदार धस यांच्या मार्गदर्शनाखाली करून शहराच्या विकासासाठी कटीबध्द असल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जिया बेग यांनी सांगीतले.