व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

लेकीची भेट अधुरी;लेकीला भेटण्यासाठी आलेल्या आईचा अपघाती मृत्यू

0

क्लिक2आष्टी अपडेट-मुलीला भेटण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आईचा रस्ता ओलाडतांना स्वीप्ट कारचा धक्का लागल्याने पाठीमागून येणार्‍या बसखाली आल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान घडली.तायराबी शेख वय वर्ष ७० रा.कुक्कडगांव असे मृत महिलेचे नाव आहे.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परंडा तालुक्यातील कुक्कडगांव येथील तायराबी शेख वय वर्ष ७० या आष्टी तालुक्यातील धानोरा येथे राहत असलेल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या.धानोरा येथे उतरल्यानंतर त्या मुलीच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना अहमदनगर वरून जामखेड कडे जाणार्‍या स्वीप्ट कार क्रमांक एम.एच १३,ए.जे,१९००हिने महिलेला धक्का दिल्याने भोकर वरून अहमदनगर कडे जात असलेल्या बस क्रमांक एम.एच.२०,बी.एल.४०१० या नांदेड आगाराच्या बस खाली आल्याने यात वयोवृद्ध महिला तायराबी शेख यांचा बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान मृत्यू झाला.घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार बाबु तांदळे,भरत माने यांनी भेट देऊन पंचनामा केला.कडा प्राथमिक आरोग्य शवविच्छेदन करण्यात आले.अंभोरा पोलिस ठाण्यात अपघाताला कारणीभूत ठरणारी दोनही वाहने लावण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.