व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेला “धनश्री” ची पन्नास हजाराची मदत

आदर्श शिक्षिका आशाताई शिंदे यांच्याहस्ते धनादेश सुपूर्द

0

क्लिक2आष्टी अपडेट-कायम सामाजिक कामात अग्रेसर असलेली “धनश्री नागरी सहकारी पतसंस्थेने” या ही वर्षी आपल्या संस्थेच्या धर्मादाय निधीतून तालुक्यातील टाकळसिंग येथील जिल्हा परिषद शाळेला ५० हजार रूपायांचा धनादेश सुपूर्द करत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

आष्टी शहराची ग्रीन शहर बनविण्यात मोलाचा वाटा असणा-या “धनश्री”नागरी सहकारी पतसंस्थेने करत प्रत्येक वर्षी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत सामाजिक कार्यात हिररीने सहभाग घेत असून,संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी यावर्षीचा संस्थेचा धर्मादाय निधी हा तालुक्यातील टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेला देण्याचे ठरविले.हा मदतीचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या पत्नी जिल्हा परिषद कन्या प्रशाळा आष्टी येथील आदर्श शिक्षिका आशा शिंदे,संस्थेचे सचिव जितेंद्र शिंदे यांच्याहस्ते टाकळसिंग शाळेचे मुख्याध्यापक महेश शिंदे यांना ५० हजार रूपायांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी टाकळसिंग जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महेशकुमार शिंदे,हसन सय्यद,कैलास नांदे,महेशकुमार तवले,श्रीराम जगताप,शेषराव सानप, प्रवीणकुमार सिद्धेश्वर,गोरक्षनाथ गायकवाड,शशिकांत खाडे,सूर्यकांत शिंदे,शिवाजी कर्डिले,रमेश म्हस्के,विकास कर्डिले,राजेश बोडखे,संदिप शिंदे,मनिषा उजगरे,माधुरी शिंदे,क्षीरसागर,नागरे,देवकाते यांच्यासह विद्यार्थी,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संस्था दरवर्षी करणार मदत
संस्थेने आत्ता पर्यंत आष्टीशहरासह ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करत त्यांचे संगोपणही करत आहे.तसेच दरवर्षी आष्टी तालुक्यातील जे गाव चांगले वृक्ष लागवडी साठी सहकार्य करून संगोपणाची जबाबदारी घेईल त्या गावात १०० वटवृक्षांची लागवड करणे,चांगले काम करणा-या जि.प.शाळा व मुख्यमंञी सहाय्यता निधी ह्या तीन कामांना या आगोदरही अन् येथून पुढेही दरवर्षी निधी देण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे.
-जितेंद्र शिंदे,सचिव धनश्री पतसंस्था आष्टी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.