व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं…मराठा समाजाच्या घोषणांनी तहसिल परिसर दणाणला

विविध मागण्यांचे मराठा समाजाचे तहसिलदार यांना निवेदन

0

क्लिक2आष्टी अपडेत-आरक्षण आमच्या हक्काचं…नाही कुणाच्या बापाचं…,कोण म्हणतं देणार नाही…घेतल्या शिवाय राहणार नाही..,मराठा समाजाचा ओबीसीमध्ये.. समावेश झालाच पाहिजे…या घोषणांनी आष्टी तहसिल कार्यालय दणाणून जाऊन,आपल्या मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.
एक दिवस भविष्यासाठी,मराठ्यांचा ओबीसी समावेशासाठी!!या मागणीसाठी संपूर्ण राज्यात दि.९ रोजी सकाळी ११ वा.तहसिल कार्यालयावर मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.आष्टी तहसिल कार्यालयावर मराठा समाजाच्या मोर्चा धडकण्यात आला.यावेळी विविध घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.समाजाच्या विविध मागणीचे निवेदन आष्टी तहसिलदार यांना देऊन,आमच्या मागण्या सरकार पर्यंत पोहच कराव्यात अशी विनंतीही समाजाच्या वतीने करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.