व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

न्यू आष्टी-अहमदनगर डेमू रेल्वेने घेतला पेट;कोणतीही जिवीतहानी नाही

अगीचे कारण अस्पष्ट

0

click2ashti update-अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेने आज न्यू आष्टीवरून अहमदनगरकडे जातांना नारायण डोहच्या पुढे असलेल्या नगर सोलापूर हायवे वरील गेट जवळ अचानक पेट घेतल्याने,एकच खळबळ उडाली आहे.या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नसून आगेचे कारण माञ अस्पष्ट आहे.

गेल्या वर्ष भरापासून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे अहमदनगर-आष्टी पर्यंत काम पुर्ण झाले असून,अहमदनगर-न्यू आष्टी रेल्वेसेवा दि.२३ सप्टेंबर २०२२ पासून नियमित सुरू झाली आहे.हि रेल्वे अहमदनगर वरून सकाळी ७.४५ वा.निघते व न्यू आष्टी येथे १०.१५ वा.येते त्यानंतर न्यू आष्टी वरून ११ वा.निघून दुपारी २ वा.अहमदनगर येथे पोहचते परंतु आज सोमवार दि.१६ रोजी अहमदनगर येथूनच सकाळी १०.३० वा गाडी सुटल्याने रूटींग प्रमाणे न येता रेल्वे लेट झाली.ही रेल्वे पुन्हा आष्टी येथून अहमदनगर येथे जात असतांना दुपारी ३.३० वा.नारायणडोह च्या पुढे गेल्यानंतर अहमदनगर-सोलापूर मार्गावरील गेट क्राॅस करतांना अचानचक पुढील चार-पाच बोगीला आग लागली.त्यानंतर एकच खळबळ उडाली यामध्ये कुठलीही जिवीत हानी झाली नसून,रेल्वे अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदनगर महापालिका कर्मचारी व नागरीकांनी प्रयत्न करून आटोक्यात आणली आहे.
एकही टिकीट विक्री नाही
सोमवार ते शनिवार नियमित अहमदनगर ते न्यू आष्टी रेल्वे सेवा सुरूळीत सुरू आहे.परंतु दर रविवारी ही डेमो पुणे येथे साफसफाई व डिजेल भरण्यासाठी जाते.त्यामुळे सोमवारी हि रेल्वे वेळेवर न येता उशीरा येते.त्यामुळे आज दि.१६ रोजी न्यू आष्टी,कडा,न्यू धानोरा,सोलापूरवाडी,न्यू लोणी व नारायणडोह या रेल्वे स्टेशनवरून एकही तिकीट विक्री झाली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.