व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आता शहरातील मालमत्ताची होणार नंबरींग नागरिकांनी सहकार्य करावे नगर पंचायतचे अवाहन

आष्टी नगर पंचायतकडून कामाला सुरूवात-मुख्यअधिकारी बाळदत्त मोरे

0

click2ashti update-आष्टी नगरपंचायत हद्दीतील नव्याने इमारत बांधकाम करून भोगवटा प्रमाणपत्र घेतलेल्या मिळकत धारकास,भोगवटादार,भाडेकरु,मोकळ्या भूखंडाचे मालक त्यांचे नियुक्त केलेले प्रतिनिधीच्या मिळकतींचे सर्व्हे करण्याचे काम हाती घेण्यात आले असून नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता नंबरिंगला शनिवार दि.२१ ऑक्टोबर रोजी पासून सुरुवात करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी नगरपंचायतने प्राधिकृत केलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांला सहकार्य करावे असे आवाहन प्रसिद्धीपत्राद्वारे नगरपंचायतचे मुख्याधिकारी बाळदत्त मोरे यांनी केले आहे.

या प्रसिद्धी पत्रकाद्वारे महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अन्वये सन २०२३-२४ ते २०२६- २७ या सालासाठी अंमल होण्यासाठी,शहरातील सर्व वार्डाची चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात येणार आहे. त्याकरिता आष्टी नगर पंचायत हद्दीतील मिळकतींचे सर्व्हेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १२४ व ११५ मधील तरतुदीप्रमाणे आपले गृहनिर्माण संस्थेत अपार्टमेंट, वाणिज्य मिळकती,निवासी मिळकती,मोकळ्या भूखंडाचे मालक इत्यादीमध्ये राहत असलेले भोगवटादार यांच्या नावाची यादीची एकत्रित माहिती व भाडेकरू यांच्या बरोबर झालेल्या भाडे करारनाम्याचे सत्यप्रत, प्रमाणपत्र व मालकी हक्काची सिटी सर्व्हे किंवा ७/१२ कागदपत्रे तसेच नगरपंचायत हद्दीतील मिळकतीचे (इमारती खुल्या जागा) संबंधीची योग्य व वस्तुनिष्ठ अशी माहिती इकडून नगर पंचायतने प्राधिकृत केलेली एजन्सी,कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अॅन्ड कन्सलटंट प्रा. लि.,अमरावती यांचे प्रतिनिधींना मिळकतीच्या तपासणीचे वेळी समक्ष विवरण पत्र भरून घ्यावेत व माहिती मुदतीत देण्यात यावी.अन्यथा ती माहिती नगरपंचायतीस उपलब्ध करून घेणेचा अधिकार असेल तरी या कामी शहरातील नागरिकांनी नगरपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन आष्टी नगरपंचायत मुख्याधिकारी बाळदत्त मोरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.