रस्ताचे काम दर्जेदार व्हावे म्हणून गावक-यांनी पुढाकार घ्यावा-आमदार सुरेश धस
पिंपरी घुमरी येथे रस्ता कामांचा आ.धस यांच्याहस्ते शुभारंभ
click2ashti update-गावातील रस्ताचा काम चांगले झाले तर गावातील दळण-वळण वाढवून गावची आर्थिक स्थिती मजबूत होते.यासाठी आपल्या गावाला मंजूर झालेला रस्ता दर्जेदार होण्यासाठी गावक-यांनी पुढाकार घेऊन चांगले काम करून घ्यावे,तसेच उर्वरित रस्ताही कामही लवकर पुर्ण होण्यासाठी मंजूरी लवकरात लवकर आणणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली.

आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथे ७ कोटी ८० लाख पिंपरी ते गवळी गोठे व पिंपरी ते वाहिरा या रस्त्याचा शुभारंभ आज शनिवार दि.२१ रोजी सकाळी ९ वा. आमदार सुरेश धस यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास आबा पांडूळे,सरपंच दादा पांडूळे,जयसिंग गव्हाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिवाजी सानप,राजाभाऊ गावडे,माजी पंचायत समिती सदस्य भानुदास बोडखे,अभिजित शेंडगे,संजय आजबे,राजाभाऊ गावडे,मनोज थोरवे,डाॅ.पाडूरंग चौधरी,अशोक परकाळे,नवनाथ जगताप यांच्यासह आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक इंजि.प्रल्हाद तळेकर यांनी आता रस्ताची आपणा सर्वांना गरज असून,लोकांनी स्वत;हून थोडं-थोडं मागे सरकून घ्यावे म्हणजे पुढे अडचण येणार नाही हे काम चांगल्या दर्जाचे होईल अशी ग्वाही तळेकर यांनी दिली.पुढे बोलतांना आ.धस म्हणाले,आपल्याकडे कार्यक्रम छोटा असला तरी मोठा गवगवा करायची सवय आहे त्यामुळे आपण आता सत्कारालाच फाटा देत फक्त कामातूनच दाखविन देण्याची गरज आहे.तालुक्याची परिस्थिती एवढी गंभीर होती पण गणपती बप्पा थोड्या प्रमाणात पावल्याने आपला दुष्काळ काहि प्रमाणात अटोक्यात येऊन पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.शेतक-यांनी आता जनावरांना चारा मिळविण्यासाठी आपण मका पेरणीकडे कल वाढवून जनावरांच्या चारांचा प्रश्न ब-यांपैकी मार्गी लागेल.शेतक-यांनी दुधाकडे कल असल्याने आर्थिक उत्पनात कल वाढणार असल्याचेही आ.धस यांनी सांगितले.
सभामंडपासाठी दहा लाखांचा निधी जाहिर
पिंपरी घुमरी गावातील नागरिकांनी आपल्याकडे गावात सभामंडप देण्यात यावे म्हणून मागणी केली होती.आपण या गावातील नागरिकांच्या मागणी मंजूर करत आपल्या गावातील दहा लाख रूपये निधी देण्याची घोषणा आमदार धस यांनी करत याठिकाणी पञ्याचा सभामंडप आपण करून घ्यावा असेही आमदार धस यांनी सांगीतले.