व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

अपघात वार;आष्टी तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघातात नऊ ठार,१२ जखमी

आ.धसांची घटनास्थळी धाव

0

click2ashti update-मुंबईहून बीडला निघालेल्या सागर ट्रॅव्हल्सचा आष्टी शहरापासून बारा कि.मी.अंतरावर असलेल्या गांधनवाडी फाट्याजवळ ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भिषण अपघातात पाच ठार झाले असून,नऊ जण जखमी झाले असून,दुसरा अपघात बीड-कल्याण महार्गावर रूग्णवाहिकेत रूग्णांना धामणगांवरून नगर येथे उपचारासाठी घेऊन जाण्या-या रूग्ण वाहिकेला अपघातात डाॅक्टरासहित चार जण ठार झाल्याने दोन वेगवेगळ्या अपघातात नऊ ठार झाल्याने बीड जिल्हा हदरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनगर येथे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगाव जवळ दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि मालट्रक यांचा रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान अपघात झाला.यामध्ये सांगवीपाटण येथील डॉ.राजेश झिंजुर्के (वय ३८) आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडे (रा.धामणगाव),व अन्य दोन जण असे चार जण ठार झाले आहेत.एका जखमीवर उपचार सुरु आहेत.या रुग्णवाहिकेमध्ये एकूण पाच जण होते.आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक (क्र.एम.एच.२१ एक्स ८६००) हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता.रात्री ११ वाजेदरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुगणवाहिकेने (क्र.एम.एच.१६ क्यू.९५०७) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका
चालक भरत सिताराम लोखंडे (वय ३५ रा.धामणगाव ) मनोज पांगु तिरपुडे,पप्पु पांगु तिरखुंडे दोन्ही राहणार जाटदेवळा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तर दुसरा अपघात आष्टी तालुक्यातील नगर-जामखेड रोडवरील गांधनवाडी फाट्याजवळ मुंबईहून बीड कडे येत असलेली सागर ट्रॅव्हल्स (एनएल ०१ बी २४९९) सकाळी ६.२० मिनिटाने या चालकांचा ताबा सुटल्याने मोठा अपघात झाला.यामध्ये एकूण ४३ प्रवाशी होते.त्यापैकी ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.तर एकूण १२ जखमींना जामखेड,आष्टी,अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.मृतांची ओळख अजून पटली नसून,पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत.
घटनास्थळी आमदार धसांची धाव
दरम्यान अपघाताची माहिती कळताच आमदार सुरेश धस यांनी फोन फिरवत तात्काळ अपघातस्थळी मदतीसाठी नागरीकांना बोलवून या ठिकाणी स्वत;हजर राहून जखमींना जामखेड,आष्टी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ कोठारी व त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(सर्व छायाचिञे-सचिन रानडे)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.