आष्टी तहसिलदारांची गाडी जळून भस्मसात;पहाटे अडीच ची घटना
पोलिस निरीक्षक खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांची घटनास्थळी भेट
click2ashti update-सध्या मराठा आरक्षणासाठी सर्वच आक्रमक भूमिका घेत असून,त्याच पार्श्वभूमीवर आष्टीचे तहसीलदार यांच्या गाडीला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.या आगीत गाडीचे संपर्ण नुकसान झाले असून,हि आग अचानक लागली की लावली पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की,रविवार दि.२९ राञी नेहमी प्रमाणे आष्टी तहसिलदार यांचे जुन्या तहसिलदार निवास समोर लावण्यात आले.पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक या गाडीने पेट घेतला.घटनेची माहिती होताच तहसिलदार प्रमोद गायकवाड यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक खेतमाळस यांना संपर्क साधत घटनास्थळी धाव घेतली.याठिकाणी नगराध्यक्ष जिया बेग यांनी नगर पंचायतच्या अग्नीशामक गाडीला बोलवत आग विजविण्यासाठी प्रयत्न केले व आग आटोक्यात आणली माञ तहसिलदार यांची गाडी पूर्ण भस्मसात झाली आहे.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे अंदोलन सुरू असून काल दि.२९ रोजी जालन्याचे तहसिलदार छाया पवार यांची गाडी अंदोलकांनी फोडून आपला राग व्यक्त केला होता.माञ आष्टी येथील तहसिलदार प्रमोद गायकवाड यांच्या गाडीला आग लावली की,आग लागली याचा अजून तपास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस करीत आहेत.घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तहसीलदार प्रमोद गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,नगराध्यक्ष जिया बेग यांची तातडीने धाव,अग्निशमन दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली नगराध्यक्ष जिया बेग यांनी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
(बातमी व फोटो स्ञोत-सचिन रानडे,आष्टी)