आ.सुरेश धस यांनी वंचित,शोषित,भटके विमुक्तांसमवेत,दिवाळी पाडवा सण केला साजरा…
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केली दिवाळी साजरी
click2ashti update-दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, समाजातील शोषित,वंचित समाजाच्या जीवनामधील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश निर्माण व्हावा यासाठी आज लोकनेते आ.सुरेश आण्णा धस यांनी आज त्यांच्या अद्वैतचंद्र निवासस्थानी दिवाळी पाडव्यानिमित्त विविध भागातून आलेल्या समाजातील वंचित शोषित असलेला घटक जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या आदिवासी पारधी समाजातील अनेक पुरुष,महिला भगिनी मुलाबाळांसमवेत दरवर्षीप्रमाणे आजही मोठ्या उत्साहाने आ.सुरेश धस यांच्या निवासस्थानी दिवाळी पाडवा सण साजरा करण्यासाठी एकत्रित आले होते.समाजातील शोषित,वंचित असलेल्या घटकांच्या जीवनामध्ये उन्नतीची पहाट व्हावी त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होऊन त्यांच्या कष्टमय जीवनानंतर पाल्यांचे जीवन सुखकर व्हावे..यासाठी पिताश्री स्व.रामचंद्र धस दादा यांनी सुरू केलेल्या परंपरागत प्रथेनुसार आ.सुरेश आण्णा धस यांनी शोषित,वंचित,भटके विमुक्त समाजासमवेत मिठाई देऊन दीपोत्सव पाडवा दरवर्षी करत असतात याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.

सध्या बीड जिल्हा हा दुष्काळाच्या सावटाखाली आहे.त्यातच वर्षातील सर्वात मोठा उत्सवाचा सण म्हणून दिवाळी कडे आपण पाहतो.परंतु सद्यस्थितीत अनेकांनी दिवाळी ही सध्या पद्धतीने साजरी केली आहे.हे दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाला भरभराटीचे दिवस येवोत.आणि आधुनिकतेची कास धरून शेती आणि दुग्ध व्यवसायात उन्नतीने प्रगती साधून सक्षमीकरण होवो.या शोषित वंचित घटकांमध्ये बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून स्वतःआनंदित होणारे हे आगळे वेगळे व्यक्तिमत्व आहे.