व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टीकरांनी दाखवून दिले जातीच्या पलाडची माणूसकी

जावेद साठी सरसावली माणूसकी...!

0

आष्टी-शहरातील जावेद शेख नावाचा व्यक्तीला अचानक आजाराने गाठले,घरची परिस्थिती नाजूक कुणाला काहि आजाराचे गांभिर्य नाही.पण या जावेदने आपले आत्ता पर्यंतचे आयुष्य फक्त हाॅटेल मध्येच काम करत उपजिवीका भागवली.त्याला उपचारासाठी मदत करा म्हणून नगरसेवक जिया बेग,पञकार सचिन रानडे,पञकार प्रविण पोकळे व पञकार गणेश दळवी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल केली अन् या जावेद साठी माणूसकी सरसावली असल्याचे दिसून आलेच तर आष्टीकरांनी दाखवून दिले जातीच्या पालडची माणूसकी…
जावेदसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर तमाम आष्टीकरांसह जिल्ह्यातून,पर जिल्ह्यातून,नव्हे नव्हे परदेशातून ही मदत मिळाली.आम्ही खरंच या मदत करणाऱ्या दात्यांचे मानुत तेवढे आभार कमीच आहेत.शिवाय जातीभेदाच्या भिंती तोडून सर्वांनी केलेली ही मदत निच्छितपणे एक भारतीय नागरिक असल्याचा अभिमान उंचवणारी आहे.खरंच मदत घेनाऱ्यापेक्षा देणाराही मोठा असतो आणि मदत देणारा मदत कोणाला देतोय हे ही महत्त्वाचे असते ते समस्त मदत देनाऱ्यांनी दाखवून दिले आहे.ज्यांनी मदत स्वीकारली त्यांनी ही मदत देणा-यांचे नावे सोशल मिडीयावर प्रसिध्द केले आहेत.सध्या जावेदवर मुंबई येथील के ई एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्रार्थना करूयात जावेद लवकरात लवकर बरा होऊन परत आपल्यात येवो असाच आशिर्वाद सर्व मदत कर्त्यांनी जावेदला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.