आष्टी तालुक्यातील शिक्षकांची अर्थवाहीनी असलेल्या पतसंस्थेच्या निवडणूकीचे बिगुल वाजणार;अंतीम यादी झाली प्रसिध्द
विद्येमान चेरमनच्या कार्यपध्दतीमुळे शिक्षकांची नाराजी
click2ashti update-आष्टी तालुक्यातील कडा येथील विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्थेची निवडणुकीचा बार वाजला असून,येत्या दोन चार दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार आहे.त्यामुळे या शिक्षकांची अर्थवाहीनी ओळख असलेल्या पतसंस्थेची नुकतीच अंतीम मतदार यादी प्रसिध्द झाली असून,इच्छूक उमेदवारांनी आता निवडणूकीची तयारी करण्यासाठी कंबर खसली आहे.
आष्टी तालुक्यातील शिक्षकांची प्रतिष्ठेची असलेली स्वामी विवेकानंद पतसंस्थेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असून या निवडणुकीत १७ जागांसाठी किती उमेदवार येत आहेत ते लवकरच कळणार आहे.सन २०१७ च्या निवडणूकीत तीन पॅनल व सहा अपक्ष उमेदवार असे मिळून १७ जागेसाठी ५७ उमेदवार रिंगणात होते.आता या होणारा निवडणूकीत १७ जागेसाठी किती उमेदवार रिंगणात उतरतात ते लवकरच कळणार आहे.
विद्येमान संचालक मंडळ
पठाडे मारुती पंढरीनाथ(चेरमन),भादवे सुभाष उत्तमराव,
तोतरे गहिनीनाथ नामदेव,शिंदे महेशकुमार नवनाथ, खराडे संदिप आप्पासाहेब,फसले बापुसाहेब गोपीनाथ, भुकन ज्ञानदेव उत्तम,शेख अल्ताफ महंमद,उढाणे दिलीप विठोबा,आमले महादेव शिवदास,शिंदे विठ्ठल आनंदराव,वारंगुळे सचिन सुर्यभान,खुडे शिवाजी महादेव, मेहेञे विकास अशोकराव,पांढरे शिवाजी साहेबराव,श्रीमती.झांजे गांगर्डे सुनिता परमेश्वर,श्रीमती.उगले-कोरडे रुपाली दादाहरी असे होते.
पतसंस्थेवर कायम आमदार सुरेश धस यांचे वर्चस्व
दरम्यान १९७४ साली स्थापन झालेली शिक्षकांची असलेली पतसंस्था सन १९९९ पासून आमदार सुरेश धस यांनी लक्ष घालून पतसंस्थेचे रूपडे बदलून टाकले आहे.परंतु गेल्या पाच वर्षात विद्येमान चेरमन यांच्या कार्यपध्दती विषयी शिक्षकांनमधून नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे यंदाची निवडणूक विद्येमान संचालकांना जरा कठिण जाईल अशी चर्चा शिक्षकांनमध्ये सुरू आहे.