व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील वत्सला बबन विठोबा घुगे यांना पुजेचा मान

0

click2ashti update-आज कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना पुजेचा मान मिळाला आहे.घुगे हे गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे माझे मन भरुन पावले अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा कोणाच्या हस्ते करायची याची राज्यात चर्चा सुरु होती. मराठा समाजाने केलेल्या विरोधामुळे याविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मोठ्या उत्साहात यंदाची कार्तिकी एकादशीची महापूजा केली गेली.प्रथेप्रमाणे कार्तिकी एकादशी निमित्त पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली.श्री.विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, आणि त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.राज्यातील बळीराजाला सुखी ठेव अशी मागणी आपण विठूरायाच्या चरणी केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पूजा करण्याचा मान मिळाला या वारीकरीला
शासकीय पुजेसोबतच विठ्ठलाची पूजा करण्याचा मान एका भक्तला देण्यात येतो. या वेळी नाशिक जिल्ह्यातील बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला आहे. घुगे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील रहिवाशी आहेत. ते गेल्या १५ वर्षांपासून न चुकता वारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी घुगे दाम्पत यांचा सत्कार करण्यात आला.
फडणवीस यांनी मानले मराठा समाजाचे आभार
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी प्राथमिक स्वरूपात जनतेच्या वतीने विठुमाउलीची सेवा करावी ही परंपरा आहे.त्या परंपरेनुसारच आज महापूजेसाठी आलो आहे. कार्तिकी एकादशी हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. राज्यापुढे आज अनेक समस्या अनेक आहेत. विठुमाउलीकडे एकच मागणं आहे, त्या सोडवण्याच्या दृष्टीने आम्हाला शक्ती द्यावी,आशीर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या,ही विठ्ठलचरणी प्रार्थना करत असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केली.दरम्यान, सकल मराठा समाज आंदोलकांनी शासकीय महापूजेला असलेला विरोध मागे घेतला याबद्दल पंढरपूरमधील मराठा समाजाचे त्यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.