व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

बिगुल वाजला ! तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहिर

२८ नोंव्हेंबर पासून अर्ज भरणे सुरूवात तर २० डिसेंबरला निकाल

0

आष्टी- माहे नोव्हेंबर डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यातील सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका कार्यक्रम निवडणूक विभागाने नुकताच जाहीर केला आहे.यात आष्टी तालुक्यातील १०९
ग्रामपंचायतचा समावेश आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि.18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.निवडणुका घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निवडणुकांची तयारी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.माहे नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या राज्यात सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायती असून यात बीड जिल्ह्यातील सुमारे ७०४ असून आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचा समावेश आहे.या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते.अखेर आज निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.
आता गावागावात राजकीय फड रंगणार असल्याचे चिञ दिसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.