व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

मराठा आरक्षणाचे अंदोलन सरकारने गांभिर्याने घ्यावे,नसता मोठा अनर्थ होऊ शकतो-आ.बाळासाहेब आजबे

विधानसभेत केली मागणी

0

click2ashti update-सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा व धनगर आरक्षणा प्रश्न अनुषंगाने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी मराठा व धनगर समाजा च्या मागणीचा विचार करून 24 तारखेच्या आत सकारात्मक विचार करून आरक्षण द्यावे अशी मागणी विधानसभेत आमदार बाळासाहेब आजबे यांनी केली.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण व धनगर आरक्षणासंदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांनी मराठा समाजाची व धनगर समाजाची पोट तिकडीनेन बाजू मांडत सध्या सुरू असलेल्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करून जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा सरकारने गांभीर्याने विचार करून 24 डिसेंबरच्या आत काय निर्णय घ्यायचा ते घ्यावा इतर समाजावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सरकारचे तात्काळ निर्णय घ्यावा, ग्रामीण भागातील मराठा समाजाला जमिनी कमी राहिल्या असून त्यांचे लेकरांचे शिक्षण होणेही अवघड आहे त्यामुळे मराठा समाजाला आज आरक्षणाची गरज आहे मनोज पाटील यांच्या आंदोलनाला त्यामुळेच मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज 24 तारखेला सरकार काय निर्णय घेते याकडे लक्ष देऊन आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन कुठल्या परिस्थितीत कमी झालेले नाही त्याचा उद्रेक होण्याअगोदर राज्य सरकारने 24 तारखेचे आत मराठा आरक्षण व धनगर आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा विनाकारण ओबीसी समाज व मराठा समाजामध्ये चिखल फेक होताना दिसत आहे समाजामध्ये दरी निर्माण होत आहे हे थांबवायचे असेल तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सरकारने मार्गी काढावा अशी जोरदार मागणी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी विधानसभेत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.