व्हाट्सअप चॅनेल जॉईन करा

आष्टी तालुक्यातील या गावातील होणार ग्रामपंचायत निवडणूका

ह्या निवडणूका निवडणूका खेळी-मेळीत पार पडतील-तहसिलदार विनोद गुंड्डमवार

0

आष्टी-नुकताच निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर केला असून,या मध्ये आष्टी तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतचा बिगुल वाजला असून,या निवडणूकासाठी प्रशासन सज्ज असून तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूका खेळी-मेळीत पार पडतील असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी व्यक्त केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करताच आष्टी निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी आष्टी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने पञकारांशी तहसिल कार्यालयात संवाद साधला.पुढे बोलतांना ते म्हणाले,ग्रामपंचायत निवडणूकीचा बिगुल वाजला असून जिल्ह्यात सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड तालुका व त्यानंतर आष्टी तालुक्यात आहेत.त्याअनुषंगाने आम्ही प्रशासनाच्या वतीने निवडणूकीसाठी सज्ज असून,आता होणा-या १०९ ग्रामपंचायतच्या निवडणूका ही शांततेत खेळी-मेळीत पार पडतील असा विश्वास तहसिलदार विनोद गुंड्डमवार यांनी व्यक्त केला.

या ग्रामपंचायतच्या होणार निवडणुका

—————————————————
केळ,खुंटेफळ(वा),नांदा,पुंडी,भाळवणी,मांडवा,वाहिरा,
सराटेवडगांव,हिंगणी,अरणविहरा,केळसांगवी,घाटा पिंप्री,
पिंप्री आष्टी,फत्तेवडगांव,बांदखेल,बेलगांव,बोरूडी,
शेकापूर,सुलेमान देवळा,कापसी,घोंगडेवाडी,चिंचाळा, देसूर,पिंप्री घाटा,पोखरी,वाघळूज,साकत,खरडगव्हाण,
महिंदा,कानडी (खु),कानडी(ब्रु),कारखेल(ब्रु),कोहिनी, चिंचोली,बाळेवाडी,वाळूंज,शेडाळा,हनुमंतगांव,हाजीपूर,
करंजी,गंगादेवी,ठोबळसांगवी,पारोडी,पाटसरा,पांगुळगव्हाण,पिंपळगांव दाणी,भातोडी,उंदरखेल,कारखेल (खु),कुंबेफळ,निमगांव बोडखा,लमाणतांडा (वाघळूज), लिंबोडी,वेलतुरी,शेरी ब्रु,हातोळण,पांगरा,किन्ही,खिळद, गहूखेल,टाकळसिंग, धानोरा,नांदूर,मातावळी,सालेवडगांव,पांढरी,ब्रम्हगांव,साबलखेड, सांगवी(पाटण),सुरूडी,चिखली,जळगांव,देवळाली,देविनिमगांव,दैठणा,निमगांव चोभा,पिंप्री घुमरी,सावरगांव घाट,टाकळी अमिया,डोंगरगण, पिंपळगांव घाट,बीडसांगवी,मोराळा,अंभोरा,देऊळगांव घाट,मंगरूळ, शिरापूर,हिवरा,खडकत,जामगांव,तवलवाडी,पिंपरखेड,मातकुळी,दादेगांव,लोणी (स),शिराळ,आष्टा(ह.ना.),दौलावडगांव,पारगांव (जो),केरूळ,कासारी,धामणगांव,कडा,वंजारवाडी,हाकेवाडी, म्हसोबाचीवाडी,नागतळा या १०९ गावातील ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत.
———————————————————————

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.